PM किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी उरले फक्त ‘एवढे’ दिवस, लिंक करा ‘ही’ माहिती अन्यथा मिळणार नाहीत 2000 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर पुढील 41 दिवसांमध्ये आधार कार्ड या योजनेशी लिंक करा. नाहीतर या योजनेचा फायदा मिळवता येणार नाही. मोदी सरकारचे हे प्रयत्न आहेत की पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच याचा फायदा मिळावा. त्यामुळे याला आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे.

या योजनेअंतर्गत सरकारला एका वर्षांमध्ये 87 हजार कोटी रुपये खर्च करायचे आहेत. परंतु आतापर्यंत फक्त 27 हजार कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. याचे कारण हे आहे की आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. यामागे कागदपत्रांची पूर्तता हे एक प्रमुख कारण आहे. आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे खातेधारकांपर्यंत पोहचलेले नाहीत. म्हणून कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना ताबडतोब आधार लिंक करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांचे म्हणणे आहे की, शेतकरी सन्मान योजनेचा पैसे जशी जशी राज्यांची लिस्ट येत आहे तसा तसा वाटप होत आहे. सगळ्या राज्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थिती सुधारणा होणार आहे.

हे लोक घेऊ शकत नाहीत लाभ
1) केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरु केली आहे परंतु काही निर्बंध देखील लादले आहेत आणि ते म्हणजे आमदार, खासदार, मंत्री आणि महापौर या व्यक्ती जरी शेतकरी असतील तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

2) केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी तसेच दहा हजारांपेक्षा पेंशन मिळवणाऱ्यांना लाभ मिळणार नाही.

3) व्यवसायाने डॉक्टर, अभियंता, सीए, वकील, आर्किटेक्चर हे शेती जरी करत असले तरी त्यांना याचा लाभ मिळणार नाही.

4) मागील वर्षाचा आयकर भरणारे सुद्धा या योजनेपासून लाभ घेऊ शकणार नाहीत.

5) केंद्र आणि राज्य सरकारच्या मल्टी टास्किंग स्टाफ / चौथी श्रेणी / ड कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या ठिकाणी करा तक्रार
जर तुम्हाला या योजनेचा तिसरा हफ्ता मिळाला नसेल तर तुम्ही कृषी अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती घेऊ शकता. जर तिथेही तुम्हाला उत्तर नाही मिळाले तर कृषी मंत्रालयाला इमेल करू शकता. ([email protected]) तरीही उत्तर मिळाले नाही तर 011-23381092 यावर संपर्क साधू शकता. दिल्लीतील क्रमांक 011-23382401 आणि मेल ([email protected]) हा असून याद्वारे शंकेचे निरसन करून घेऊ शकता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी