Aadhaar Card मध्ये नाव अपडेट करणे आता झाले आणखी सोपे, ‘या’ पोर्टलवरून तात्काळ करू शकता रिक्वेस्ट; जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card हे महत्वाचे कागदपत्र असल्याने त्यामधील माहिती अपडेट असणे आवश्यक असते. UIDAI ने याबाबत ट्विट करून म्हटले आहे की, आता तुम्ही सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टलद्वारे कार्डमध्ये ऑनलाइन स्वताच तुमचे नाव अपडेट करू शकता (How to Change or Update name in Aadhar Card). यासाठी https://ssup.uidai.gov.in/ssup/ ची लिंक फॉलो करा. तुमच्या ओळखपत्राच्या मूळ प्रतीची स्कॅन केलेली प्रत अपलोड करण्यास विसरू नका.

या ट्विटसोबत एक फोटोसुद्धा आहे. फोटोमध्ये लिहिले आहे, सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलद्वारे आता आधार कार्डमध्ये आपल्या नावात किरकोळ बदल करू शकता.

 

 

नावात अशाप्रकारे बदल करू शकता :

1. नावाचे स्पेलिंग दुरूस्त करणे (जर उच्चार एकसारखा असेल तर)

2. क्रमात बदल

3. शॉर्ट फॉर्मवरून फुल फॉर्म

4. विवाहानंतर नावात बदल

तुम्हाला यासोबतच व्हॅलिड डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावे लागतील. व्हॅलिड डॉक्युमेंटच्या लिस्टची लिंकसुद्धा दिली आहे.

सेवा शुल्क :
यासाठी 50 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. तुम्ही एकाचवेळी अनेक बदल केले तरी त्यास एकच अपडेट मानले जाईल.

नोट :
आधार कार्डमध्ये (Aadhaar Card) नाव अपडेट करण्यासाठी ऑनलाइन सर्व्हिसचा लाभ घेणे आवश्यक आहे की तुमचा सध्याचा मोबाइल नंतर आधार कार्डसोबत लिंक असावा, तो अजूनही सक्रिय असावा.

Web Title :- Aadhaar Card | name change in aadhaar card becomes easier you can update the same using this portal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीपूर्वी ‘विक्रमी’ स्तरापासून 9,500 रूपयांनी ‘स्वस्त’ झाले सोने; जाणून घ्या नवीन दर

Pune BJP | प्रभाग 19 मधील समस्या सोडविण्यासाठी भाजप नगरसेविका अर्चना पाटील आणि तुषार पाटील नेहमीच अग्रेसर; मनपा निवडणुकीत काँग्रेसला त्यांची जागा दाखवा – जगदीश मुळीक (Video)

MP Supriya Sule | लखीमपूरच्या घटनेवरून खा. सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘घणाघात’, म्हणाल्या… (व्हिडीओ)