कामाची गोष्ट ! ‘आधार’कार्डवरील फोटो ‘खराब’ झालाय मग ‘नो-टेन्शन’, अपडेट करण्याची ‘ही’ सोपा पध्दत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आता तुम्हाला फार कष्ट करावे लागणार नाहीत. तुम्ही आता स्वतःच तुमचा फोटो अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्रे देखील जमा करण्याची गरज पडणार नाही. इतकेच नाही तर तुम्ही तुमची बायोमेट्रिक माहिती देखील अपडेट करू शकणार आहात. त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल आयडी देखील तुम्ही सहज अपडेट करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला केवळ तुच्या जवळच्या आधार केंद्रात जाण्याची गरज आहे.

कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही
यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने यासाठी नवीन नोटीस जारी केली आहे. यामध्ये व्यक्तिगत आधारकार्ड अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नसल्याची माहिती देण्यात आली आहे. युझरला आपला फोटो, मोबाईल क्रमांक तसेच कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे.

आधार केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा
तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि जन्मतारखेमध्ये बदल करायचा असल्यास तुम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागतात. याची माहिती देखील आधार बनवणाऱ्या कंपनीने दिली आहे.विविध आधार केंद्रावर तुम्हाला हि सुविधा मिळणार आहे. मात्र बायोमेट्रिक माहिती आणि मोबाईल क्रमांक सारखी माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.

You might also like