Aadhaar card number | तुमचा आधार नंबर सोशल मीडियावर शेअर करताय?, मग जाणून घ्या UIDAI च्या महत्वाच्या सुचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Aadhaar card number | भारतीय नागरीकांचे एक महत्नाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आहे. कोणत्याही सरकारी अथवा खासगी कामासाठी आधार कार्ड महत्वाचं कागदपत्र आहे. विशेष म्हणजे, बँक खाते, आपला मोबाईल क्रंमाक अशा महत्वाच्या कामात आधार कार्ड संलग्न केला जातो. आधार कार्डामध्ये अनेक महत्वाचे आणि सविस्तर माहिती आहे. आधार कार्डावरील युनिक आयडी नंबर (Unique ID number) खुप सोपा आहे. तसेच ऑनलाइन (Aadhaar card UIDAI) फसवणुकीचे प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे आधार कार्ड (Aadhaar card number) समाज माध्यमांवर शेअर करणे धोकादायक देखील ठरु शकतो.

 

आधार क्रमांक शेअर करु नये –

 

नागरीकाची सर्व गोपनीय (Unique ID number) माहिती आधारवरील युनिक आयडी क्रमांकामध्ये असते.
तुमचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, घराचा पत्ता, शारीरिक ओळख इत्यादी आधार क्रमांकाद्वारे शोधता येतात.
कोणत्याही गुन्हेगारासाठी तुमच्या गोपनीयतेला धोका निर्माण करण्यासाठी इतकी माहिती खूप अधिक आहे.
तसेच, ओळख सिद्ध करण्यासाठी आधारचा वापर सर्वत्र केला जातो.
पण UIDAI आधार क्रमांक सार्वजनिक करु नये, असे आधार कार्डधारक प्रश्न करत असतात. (Aadhaar card number)

 

यूआईडीएआई (UIDAI) सांगते की, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक चेक देखील सर्वत्र वापरले जातात.
पण, आम्ही या कागदपत्रांवर रेकॉर्ड केलेले नंबर कोणत्याही प्रकारे सार्वजनिक करत नाही.
आवश्यक असेल तेव्हाच आम्ही या कागदपत्रांचा वापर करतो.
त्याचप्रमाणे आधारचा वापरही गरजेनुसारच करावा.
असे केल्याने तुमची गोपनीय माहिती लीक होऊ शकते आणि तिचा गैरवापरही होऊ शकतो.

 

आधार व्हेरिफिकेशनचे किती मार्ग?

 

यूआईडीएआई ने QR कोड पडताळणी, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवाईसी पडताळणी, ई-आधार पडताळणी, ऑफलाइन पेपर-आधारित पडताळणी आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन व्हेरिफिकेशन (Aadhaar Verification) सुरू केलेय. हा नियम आधार धारकाला डिजिटल स्वाक्षरी केलेले कागदपत्र, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी, UIDAI च्या माध्यमातून तयार केलेल्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक, नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख आणि छायाचित्रासारखा, लोकसंख्येचा डेटा शेअर करण्याचा पर्याय देतो. (Aadhaar card number )

 

ऑफलाईन पर्याय काय आहे?

 

व्हेरिफिकेशनसाठी इतर पद्धती जसे की वन-टाइम पिन आणि बायोमेट्रिक आधारित प्रमाणीकरणही ऑफलाइन पर्यायांसह सुरू राहतील.
आधार डेटा व्हेरिफाई करण्यासाठी अधिकृत एजन्सी प्रमाणीकरणाची कोणतीही योग्य पद्धत निवडू शकता.
नवीन नियम आधार नंबर धारकांना त्यांचा ई-केवायसी (E-KYC) डेटा कधीही संचयित करण्यासाठी कोणत्याही व्हेरिफिकेशन एजन्सीला दिलेली संमती रद्द करण्याची मंजुरी देतात.

 

Web Title : Aadhaar card number | can sharing aadhaar number on social media be dangerous know what uidai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | पत्नीनं घरात लावला छुपा कॅमेरा, पतीचं मैत्रिणीशी असलेलं ‘झेंगाट’ झालं CCTV मध्ये कैद अन्…

Maharashtra Rains | उद्यापासून पुण्यात मुसळधार पाऊस?, IMD कडून आज ‘या’ 10 जिल्ह्यांना इशारा

Dilip Walse Patil | ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान’ ! गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून पोलिसांचे तोंडभरून कौतुक