‘या’ कारणामुळं 18 कोटी लोकांचं Pan Card ठरू शकतं निरुपयोगी, त्वरित करावं लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बायोमेट्रिक ओळखपत्र (आधार कार्ड) मधून आतापर्यंत 32.71 कोटी स्थायी खाते क्रमांक (पॅनकार्ड) जोडले गेले आहेत, असे भारत सरकारने बुधवारी सांगितले. माय व्हिलेज इंडियाने ट्विटरवर लिहिले आहे, आधारमधून 32.71 कोटीहून अधिक पॅन जोडले गेले आहेत. सरकारने पॅनशी आधार जोडण्याची तारीख यापूर्वी 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. ट्विटनुसार, 29 जूनपर्यंत 50.95 कोटी पॅन देण्यात आले आहेत.

लिंक केले नाही तर होईल निष्क्रिय

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार जर ठरलेल्या कालावधीत पॅन आधारमध्ये जोडले गेला नाही तर ते निष्क्रिय होईल. एका वेगळ्या ट्वीटमध्ये माय व्हिलेज इंडियाने ग्राफद्वारे आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या उत्पन्नाच्या वितरणाची माहिती दिली आहे. त्यानुसार आयकर विवरणपत्र भरणारे 57 टक्के युनिट्स अशी आहेत की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आकडेवारीनुसार, 18 टक्के ते लोक भरतात ज्यांचे उत्पन्न 2.5 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नातील 17 टक्के आणि सात टक्के ते आहेत ज्यांचे उत्पन्न 10 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांपैकी फक्त एक टक्के लोक आपले उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त दाखवतात.

18 कोटी लोक शिल्लक आहेत, 7 महिन्यांचा कालावधी बाकी

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सुमारे 18 कोटी पॅनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. आकडेवारीनुसार बायोमेट्रिक ओळखपत्रातून आतापर्यंत 32.71 कोटी स्थायी खाते क्रमांक (पॅन) जोडले गेले आहेत. त्याचबरोबर 29 जूनपर्यंत 50.95 कोटी पॅनचे वाटप करण्यात आले आहे. म्हणजे जवळपास सध्याला 18 कोटी पॅनकार्ड आधारशी जोडलेले नाहीत. जर तुम्ही देखील या यादीमध्ये समाविष्ट असाल तर तुमच्याकडे अवघ्या 7 महिन्यांचा कालावधी लांबणीवर पडला आहे.

पॅनला आधारशी कसे जोडावे

आपल्याला www.incometaxindiaefiling.gov.in  साइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला लिंक आधारचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल. या विंडोमध्ये आपला आधार नंबर, पॅन नंबर, नाव, कॅप्चा कोड भरा. यानंतर लिंक आधार वर क्लिक करा. क्लिक करताच आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.