Aadhaar Card | तुमच्या ‘आधार कार्ड’चा चुकीचा वापर तर होत नाही ना? ‘या’ पध्दतीनं तपासा चेक करा आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) चा वापर जवळपास प्रत्येक ठिकाणी होतो. आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी खुप महत्वाचे कागदपत्र आहे. हे सर्वात महत्वाच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी एक आहे. सर्व सरकारी योजना, सबसिडी इत्यादीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र एखाद्या फ्रॉडमुळे तुमच्या आधार कार्डचा (Aadhaar Card) चुकीच्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या आधारकार्डचा कुठेतरी चुकीचा वापर होत आहे तर एका सोप्या पद्धतीने तुम्ही हे जाणून घेवू शकता…

 

UIDAI देते विशेष सुविधा

 

आधार नंबर जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (unique identification authority of india) म्हणजे यूआयडीएआय (UIDAI) ही सुविधा देते की, तुम्ही हे चेक करू शकता की तुमचे आधार कार्ड कुठे-कुठे वापरले आहे.

 

आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री अशी चेक करा

 

  • यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असावा.
  • आधारची वेबसाइट UIDAI वर जा.
  • यानंतर होमवर Get Aadhaar वर क्लिक करा.
  • नंतर Download Aadhaar वर क्लिक करा.
  • आता येथे View More ऑपशनवर क्लिक करा.
  • येथे Aadhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर जा.
  • आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • येथे नवीन इंटरफेस उघडेल. आता तुमचा आधार नंबर टाका आणि कॅप्चा एंटर करून सेंड OTP वर क्लिक करा.
  • आता येथे Authentication Type वर All सलेक्ट करा.
  • आता कुठून कुठपर्यंत पहायचे आहे ती तारीख टाकू शकता.
  • येथे किती रेकॉर्ड पहायचे आहेत ते एंटर करा. आता ओटीपी टाकून व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर नवीन इंटरफेस उघडेल.
  • येथे तुमच्या डिटेल्स प्राप्त करू शकता.

 

आधार कार्डचा (Aadhaar Card) चुकीचा वापर झाल्यास अशी करा तक्रार

 

जर तुम्हाला कोणताही दुरुपयोग झाल्याची शंका असेल किंवा तुमच्या आधारच्या वापरात काही अनियमितता आढळत असेल तर ताबडतोब युआयडीएआयचा टोल फ्री नंबर- 1947 वर संपर्क करू शकता किंवा ईमेलच्या माध्यमातून [email protected] वर संपर्क करू शकता. (Aadhaar Card)

 

Web Title : Aadhaar Card | uidai update is your aadhaar card being misused here is how to check out aadhaar authentication history

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mutual Fund SIP | केवळ 14,500 रुपये गुंतवून बनवू शकता 23 कोटी रुपयांचा फंड, जाणून घ्या काय करावे?

Udayanraje Bhosale | शिवेंद्रराजेंचा विरोध असतानाही उदयनराजेंची बिनविरोध निवड !

Devendra Fadnavis | नवाब मलिकांनी हायड्रोजन ‘बॉम्ब’ फोडत गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीसांनी केलं ‘हे’ Tweet