Aadhaar Card Update | आता तुम्ही मराठीसह ‘या’ 12 भाषांमधून बनवू शकता आधार कार्ड, ‘या’ पध्दतीनं करा अपडेट, जाणून घ्या

नवी दिल्ली : Aadhaar Card Update | अजूनपर्यंत आधार कार्ड इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये तयार होत होते. परंतु आता आपल्या प्रदेशाच्या भाषेत सुद्धा आधार कार्ड बनवू शकता. आधार कार्ड (Aadhaar Card Update) तुम्ही तुमच्या सुविधेनुसार, आसामी, उर्दू, पंजाबी, तमिळ, तेलगु, हिंदी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, उडिया, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषेत सुद्धा बनवू शकता. हे तुमच्यावर सुद्धा अवलंबून आहे की तुम्हाला कोणत्या भाषेत आपले आधार कार्ड पाहिजे.

 

आधार कार्ड अपडेट (Aadhar Card update) होण्यास एक ते दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. तुम्ही आधार सेंटर (Aadhar Center) वर जाऊन सुद्धा ते आपल्या भाषेत अपडेट करू शकतात. आधार अपडेटसाठी तुम्हाला काही प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. ज्याचे पेमेंट तुम्ही ऑनलाईन बँकिंग इत्यादीने करू शकता.

 

आपल्या भाषेत आधार कार्ड बनवण्याची पद्धत

– सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.

– येथे आधार कार्ड अपडेटचे ऑपशन दिसेल, त्यावर क्लिक करा.

– येथ Update demographics data & check status ऑपशनवर क्लिक करा.

– आता नवीन विंडोमध्ये लॉग-इन करण्यासाठी सांगितले जाईल. येथे आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका.

– यानंतर आधारसोबत रजिस्टर नंबरवर OTP मिळेल.

– OTP व्हेरीफाय होताच नवीन विंडोमध्ये demographic data नोंदवा.

– येथे तुमच्या प्रदेशाची भाषा सिलेक्ट करा.

– येथे नाव, पत्ता ऑटो सिलेक्ट होईल.

– सांगितलेली प्रोसेस फॉलो करत पुढे जाऊ शकता.

– आपल्या नावाचे स्पेलिंग, मात्रा इत्यादी चेक करा आणि सबमिट करा.

– प्रीव्ह्यूच्या वेळी लक्षपूर्वक सर्व डाटा आणि नावाची अक्षरे तपासून पुढ जा.

– यानंतर मोबाईलवर एक ओटीपी रिसिव्ह होईल जो नोंदवून OK करा.

 

Web Title :- Aadhaar Card Update | now change name and address in marathi and other 12 regional language in aadhaar card update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा