Aadhaar संबंधित सर्व समस्याचं फक्त एका कॉलवर होईल ‘समाधान’, ‘या’ नंबरवर करा फोन; 12 भाषांमध्ये मिळेल सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. पण त्यासंबंधी काही तक्रार असल्यास याची मोठी अडचण होत असे. मात्र, आता तुम्हाला या अडचणींपासून थोडा दिलासा मिळणार आहे. कारण आता तुम्हाला आधारकार्डसंबंधी कोणतीही अडचण असेल तर फक्त एक फोन करावा लागेल. त्यानंतर तुमची अडचण दूर होऊ शकेल.

आधारकार्डधारकाला 1947 या क्रमांकावर फोन करून माहिती मिळू शकते. नागरिकांना ही सुविधा 12 भाषांमधून मिळू शकते. याबाबतची माहिती UIDAI ने ट्विट करून दिली आहे. नागरिकांना हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिल, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडीया, बंगाली, असमिया आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध आहे. ही सुविधा मोफत असून, 24 तास सुरू असणार आहे.

दरम्यान, UIDAI कडून ही सुविधा विनामूल्य दिली जाणार आहे. या कॉल सेंटरवरील प्रतिनिधी सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत उपलब्ध असणार आहे. तर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू असेल, असेही सांगण्यात आले आहे.