Aadhaar Card Updates | घरबसल्या बनवू शकता आधार कार्ड ! फोन नंबर आणि बायोमेट्रिक सारख्या अपडेटसाठी सुद्धा जावे लागणार नाही आधार केंद्रात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card Updates | आधार जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कार्डधारकांना घरपोच सेवा देण्यासाठी सज्ज आहे. या सुविधेमुळे लोक घरबसल्या त्यांच्या आधार कार्डमधील फोन नंबर, पत्ता, नाव, बायोमेट्रिक आणि इतर तपशील बदलू शकतील. (Aadhaar Card Updates)

 

घरोघरी ही सुविधा सुरू झाल्यानंतर, आधार कार्डधारकांना यापुढे आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. सध्या UIDAI कार्डधारकांना पत्ता इ. तपशील ऑनलाइन बदलण्याचा पर्याय देते. फोन नंबर अपडेट किंवा बायोमेट्रिक तपशील यांसारख्या बदलांसाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागते.

 

48,000 पोस्टमनचे प्रशिक्षण
आधार अपडेट प्रक्रिया सरळ आणि सोपी करण्यासाठी, युआयडीएआय इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत कार्यरत सुमारे 48,000 पोस्टमनला प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते नागरिकांना घरी जाऊन सेवा देतील. एकूण 1.5 लाख पोस्टमनना दोन वेगवेगळ्या टप्प्यांत प्रशिक्षण दिले जाणे अपेक्षित आहे. (Aadhaar Card Updates)

पोस्टमन असतील डिजिटल गॅजेट्सने सुसज्ज
मीडिया रिपोर्टनुसार, पोस्टमन नवीन आधार कार्ड बनवण्यातही मदत करतील. ते डिजिटल गॅजेट्सने सुसज्ज असतील. युआयडीएआयने देशातील प्रत्येक 755 जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रे उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या 72 शहरांमध्ये 88 युआयडीएआय सेवा केंद्रे आहेत.

 

अनेकदा होऊ शकत नाही बदल
आधार कार्डमध्ये कोणताही बदल फक्त काही वेळा होतो. त्यानंतर तुम्ही ते बदलू शकत नाही.
2019 मध्ये, युआयडीएआयने नाव, जन्मतारीख आणि लिंग बदलण्यावर मर्यादा घातली होती.

यासाठी तुम्हाला थोडे शुल्कही द्यावे लागेल. उदाहरणार्थ, तुम्हाला बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये,
डेमोग्राफिक अपडेटसाठी 50 रुपये आणि रंगीत आधार डाउनलोड करण्यासाठी 30 रुपये द्यावे लागतील.

 

Web Title :-  Aadhaar Card Updates | you will not have to go to aadhar center for updates like aadhar card phone number and biometric at home

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा