Aadhaar Card | मोबाईलनंबर नसतानाही आधारकार्ड डाऊनलोड करता येऊ शकत; जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Aadhaar Card | सध्या कोणतेही सरकारी किंवा खासगी काम असले तर आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक मानलं जात आहे. पण, मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, रजिस्टर मोबाईल नंबर नसला तरी आधार कार्ड डाऊनलोड करता येऊ शकत. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर असणं अनिवार्य होतं. परंतु युआयडीएआयने महत्त्वाची घोषणा केली असून आता ज्या लोकांचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये रजिस्टर्ड नाही, अशांनाही आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप्सचा वापर करावा लागेल.

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. इथे My Aadhaar सेक्शनवर क्लिक करा.
त्यानंतर Order आधार PVC Card वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार नंबरची मागणी केली जाईल. त्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबर टाकावा लागेल.
मात्र इथे आधार नंबर ऐवजी १६ अंकी वर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर अर्थात VID चा वापर करावा लागेल आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
त्यानंतर तिथे काही पर्याय येतील त्यापैकी My Mobile Number Is Not Registred वर क्लिक करावं लागेल.

इथे दुसरा नंबर टाकल्यानंतर Send OTP वर क्लिक करा. OTP टाकून एंटर करा. Terms and Condition वर क्लिक करुन सब्मिटवर क्लिक करा.
आता आधार लेटरचा Preview मिळेल. Make Payment ऑप्शनवर क्लिक करून आधार कार्ड डाउनलोड करुन त्याची प्रिंटआउट काढू शकता.

 

Web Title :  Aadhaar Card | without mobile number download aadhaar card check simple process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Harshvardhan Patil | ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’

Sanjay Raut | ‘लोकांना कधी कधी वाटत अजुनी यौवनात मी…’ फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला (व्हिडीओ)

Chandrakant Patil | शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, चंद्रकांत पाटलांचा पलटवार (व्हिडीओ)