‘आधार’कार्डमध्ये नाव, जन्मतारीख ‘अपडेट’ करण्याच्या संदर्भातील 4 नियमात बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारचा वापर वेगाने वाढत आहे. पैशांचे व्यवहार असेल किंवा काही सरकारी कामे आधार कार्ड आवश्यक झाले आहे. परंतू तुमचे आधार कार्ड हरवले तर तुम्हाला ते महागात पडते. जर आधारमध्ये काही चूक असेल तरी तुम्हाला त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड अपडेट संबंधित माहिती असणे आवश्यक आहे.

UIDAI ने नुकतेच आधार कार्डच्या नावात, जन्मतारखेत किंवा इतर माहिती अपडेट करायची असे तर त्यात नियम बदलण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार आधार कार्डवरील जन्मदिनांक, नाव आणि लिंग यात बदल करायची असेल तर आता काही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उदा, जन्मदिनांक फक्त एकदाच बदल करता येईल.

काय आहेत नियम –
1). नव्या नियमानुसार, लिंगासंबंधित काही चूक झाली असेल तर त्या फक्त एकदाच बदल होईल.
2). जर नावात बदल करायचा असेल तर त्यासाठी देखील मर्यादा निश्चित करण्यात आली. नियमानुसार आधार कार्डमध्ये नावात अपडेट फक्त दोनदा करता येईल.
3). जन्म तारखेत बदल करणे फक्त एकदाच शक्य होणार आहे. आधार कार्डमध्ये जी तारीख आहे ज्यात अधिकतम तीन वर्षांचा बदल करता येईल.
4). जर आधार कार्ड यूजरचे नाव, जन्म तारीख आणि लिंग या संबंधित जास्त काही बदल करायचे असतील तर त्यासाठी UIDAI ऑफिसमध्ये संपर्क साधावा लागेल. यासाठी यूजर्सला UIDAI ऑफिसला ([email protected]) मेल करावा लागेल. किंवा स्वत: जाऊन विनंती करु शकतात. त्या विनंतीत सांगावे लागेल की बदल का करायचे आहेत. हा निर्णय UIDAI ऑफिसचे आधिकारी घेतली. त्यासाठी ते पडताळणी देखील करतील.

Visit : Policenama.com

You might also like