धक्कादायक ! इण्डेन गॅसच्या वेबसाईटवर ६७ लाख ग्राहकांचा आधार डेटा लीक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इण्डेन गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लाखो नागरिकांचे आधार नंबर लीक झाले आहेत. त्यामुळे आधार डेटा लीक होण्यावरून सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबद्दल माहिती दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ इण्डेन गॅस कंपनीच वेबसाईटचं हे पेज गूगलशी इंडेक्स्ड होतं. सिक्युरिटीमध्ये झालेल्या चुकीमुळे आधार नंबर लीक झाले आहेत. लीक झालेले आधार नंबर सगळे जण पाहू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा धोका होण्याची शक्यता आहे.’

वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार , इण्डेनच्या वेबसाईटवर ११,००० डीलर्सचा डेटा मिळाला जो कस्टम बिल्ट स्क्रिप्टच्या ब्लॉक होण्यापूर्वी ५ .८ मिलियन (५८ लाख ) ग्राहक वापरू शकतात. ६७ लाख ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे. पेजवर फक्त नागरिकांचे आधार नंबरच नाही तर यूजर्स आयडी आणि नावंदेखील दिसत होती.

या सगळ्यानंतर तातडीने पेजवरून सगळे आधार नंबर काढून टाकण्यात आले. वेबसाईटवर आधार नंबर लीक कसे झाले आणि ते किती वेळ वेबसाईटवर दिसत होते याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.