Aadhaar Alert | UIDAI ने सुरू केले नवीन फिचर, विना इंटरनेट केवळ एका SMS ने मिळेल आधारशी संबंधीत ‘या’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  UIDAI ने आधार (Aadhaar) संबंधीत काही अशा सेवा सुरू केल्या आहेत ज्या विना इंटरनेट केवळ एसएमएसद्वारे मिळवू शकता. यासाठी अ‍ॅप, वेबसाइटची आवश्यकता नाही. या सर्व्हिसद्वारे यूजर्स आधार संबंधीत अनेक सर्व्हिसेस जसे की व्हर्च्युअल आयडी (VID) चे जनरेशन किंवा रिट्रीव्हल, आधार (Aadhaar) लॉक किंवा अनलॉक करणे, बायोमॅट्रिक लॉकिंग आणि अनलॉकिंग सारख्या सेवा मिळवू शकतात. यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून हेल्पलाइन नंबर 1947 वर एक एसएमएस पाठवायचा आहे. Aadhaar | feature get various services in just one sms here is the detail

आधारसंबंधी सेवा केवळ एसएमएसद्वारे कशा मिळवाव्यात जाणून घेवूयात…

Virtual ID कसा जनरेट करावा

मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन GVID (SPACE) आणि आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट टाका आणि तो 1947 पाठवा.

VID प्राप्त करण्यासाठी लिहा – RVID (SPACE) आणि आपल्या आधार नंबरचे शेवटचे चार अंक टाका.

दोन पद्धतीने OTP मिळवू शकता. पहिली आधार नंबरद्वारे दुसरी तुमच्या VID द्वारे.

आधारवरून OTP साठी लिहा – GETOTP (स्पेस) आणि आधारचे शेवटचे चार अंक टाका.

VID वरून OTP साठी लिहा – GETOTP (स्पेस) आणि SMS मध्ये तुमचा अधिकृत व्हर्च्युअल ID चे शेवटचे 6 डिजिट टाका.

एसएमएसद्वारे आधार लॉक आणि अनलॉक करा

लॉक करण्याची प्रक्रिया

1. एसएमएसमध्ये TEXT मध्ये जाऊन GETOTP (SPACE) आणि आधार नंबरचे शेवटचे चार अंक टाका.

2. दूसरा SMS OTP मिळाल्यानंतर ताबडतोब पाठवला पाहिजे. तो LOCKUID (SPACE) आधारचे शेवटचे 4 अंक ((SPACE) 6 अंकाचा OTP टाका.

असे करा अन-लॉक

1: एसएमएसमध्ये जाऊन लिहा GETOTP (SPACE) नंतर VID चे शेवटचे 6 अंक टाका.

2: आणखी एक एसएमएस पाठवा, ज्यामध्ये लिहा UNLOCK (SPACE) VID चे शेवटचे 6 अंक (SPACE) 6 अंकाचा ओटीपी टाका.

Web Title : Aadhaar | feature get various services in just one sms here is the detail

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Art Director Rajesh Sapte Suicide Case | मौर्या व दुबे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले; पोलिसांची न्यायालयात माहिती

Helicopter Crashes in Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील चोपडा शिवारात हेलिकॉप्टर कोसळले; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी

Woman With 2 Vaginas | अनेक वर्षापासून पीरियड्स लीकेजच्या समस्येने त्रस्त होती महिला, डॉक्टरांनी पहाताच सांगितले 25 वर्ष ’दडलेले’ सत्य