‘आधार’ कार्डव्दारे ‘इन्कम’ टॅक्स भरल्यास अधिकारी स्वतः PAN कार्डचा नंबर देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात अनेक नवनवीन संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे आयटीआर म्हणजे टॅक्स रिर्टन भरण्यासाठी आधी फक्त पॅन कार्डचा वापर करण्यात येत होता. मात्र आता त्याजागी आधार कार्डचा वापर करता येणार आहे. त्यामूळे पॅन कार्ड काय कामाचे असे म्हणून चालणार नाहीये. ही सुविधा त्या लोकांसाठी करण्यात आली आहे, ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही. कारण भारतात अधिकाधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. मात्र पॅन कार्ड नाही, त्यामुळे अनेक लोक आयटीआर भऱत नाहीत. त्यामुळे आता जे करदाते फक्त आधार कार्डच्या आधारावर आयटीआर भरतील त्यांच्यासाठी प्राप्तिकर विभाग स्वतःहून पॅन नंबर तयार करून देणार आहे. आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्पर जोडून करणार आहेत.

पॅन कार्ड काढण्यासाठी आणि आधार कार्ड काढण्यासाठी एकच माहिती द्यावी लागते. एखाद्याने ‘पॅन’ घेतले नसले तर त्यास ‘पॅन’ देणे आवश्यक आहे, असे वाटल्यास स्वत:हून ते देण्याचा अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आहे. शिवाय ज्यांच्याकडे १ जुलै २०१७ या तारखेला ‘पॅन’ आहे व जे ‘आधार’ घेण्यास पात्र आहेत अशा प्रत्येकाने ‘आधार’ क्रमांक कर विभागास देणेही बंधनकारक आहे.

दरम्यान, पॅन नंबर नसलेल्यांना प्राप्तिकर रिटर्न भरण्यात अडचण येऊ नये यासाठी दिलेली ही जास्तीची सुविधा आहे. कर देणाऱ्यांनी केवळ ‘आधार’ नंबर टाकून रिटर्न भरले तरी करनिर्धारण अधिकारी स्वत:च्या अधिकारात करदात्यासाठी एक स्वतंत्र ‘पॅन’ नंबर देईल. ‘पॅन’व ‘आधार’ची तो स्वत:हून जोडणी करेल आणि त्यानंतरच रिटर्न भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल, अशी माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर