Aadhaar संबंधी कोणत्याही कॉलसाठी फॉलो करा UIDAI चा ‘हा’ सल्ला, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Aadhaar | आधार एक अतिशय महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे. जर तुम्ही तुमची आधारसबंधी (Aadhaar) माहिती किंवा त्यासंबंधीत सुविधेचा लाभ घेताना प्राप्त होणारा OTP जर एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत शेयर केला तर यामुळे तुमची अतिशय वैयक्तिक असलेली माहिती लीक होईल, शिवाय पैशांचे सुद्धा नुकसान होऊ शकते.

याशिवाय तुम्ही ऑनलाइन फ्रॉड किंवा स्कॅममध्ये सुद्धा अडकू शकता. UIDAI ने आधार कार्ड धारकांना अशाप्रकारच्या कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट सुद्धा केले आहे.

UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा.
कधीही आपला आधार ओटीपी आणि व्यक्तीगत माहिती कुणालाही सांगू नका.
तुम्हाला कधीही यूआईडीएआयकडून आधार ओटीपी मागणारा कॉल, एसएमएस किंवा ईमेल केला जात नाही.

सध्या बँक, पॅन कार्ड, सिम कार्ड, गॅस कनेक्शन आणि अशाप्रकारच्या अनेक सुविधांसाठी आपल्याला आधार लिंक करावे लागते.
अशावेळी जर असा कॉल आला, ज्यामध्ये दावा केला जात असेल की UIDAI कडून बोलत आहोत.
तर हा फ्रॉड कॉल आहे. अशा कॉलवर कुणालाही माहिती किंवा ओटीपी शेयर करू नका.

आधार कार्डधारक आधारसंबंधी कोणत्याही मदतीसाठी टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करू शकतात. याशिवाय [email protected] वर ईमेल सुद्धा करू शकतात.

 

Web Title : Aadhaar | follow this advice of uidai for any call related to aadhaar otherwise you may have to bear the loss

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील श्री गरुड गणपती मंडळातर्फै 100 बेघर, वंचित घटकांचे लसीकरण

EPFO | पीएफ खातेधारकांना फ्री मिळते ‘ही’ 7 लाख रुपयांची सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा करावा क्लेम ?

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही करू नये ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष; मोठ्या समस्येचा आहे संकेत, जाणून घ्या