कोणत्याही Aadhaar कार्डच्या समस्येसाठी ‘या’ नंबरवर कॉल करा, UIDAI ची हेल्पलाईन जारी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी कामांपासून ते खासगी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक असल्याने त्यामधील माहिती योग्य असणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांचे आधार कार्ड हरवणे, मोबाईल नंबर लिंक नसणे, पत्ता चुकीचा, नाव-जन्मतारीख चुकीची असणे, अशा अनेक समस्या असतात. यासाठी पोस्ट ऑफिस आणि आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत होते. आता UIDAI ने टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. यामुळे नागरिकांचा मोठा त्रास वाचणार आहे.

आधार प्रणाली राबवणाऱ्या UIDAI ने हेल्पलाइन क्रमांक 1947 (Aadhaar helpline 1947) सुरु केला आहे. या क्रमांकावर 12 वेगवेगळ्या भाषांमधून संपर्क साधता येणार आहे. या क्रमांकावर फोन केल्यानंतर आधार कार्डाशी संबंधीत कोणत्याही समस्येचे उत्तर मिळणार आहे. थोडक्यात UIDAI ने कस्टमर केअर सारखे कॉल सेंटर सुरु केले आहे. UIDAI ने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे.

या भाषेत मिळणार माहिती

UIDAI ने सुरु केलेल्या हेल्पलाईन नंबरवर मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, उडिया, बंगाली, आसाम आणि उर्दू भाषांची सेवा दिली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ऑक्टोबर 2019 मध्ये आधार कार्डचं नवं प्रिटींग सुरु केले आणि आधार पीव्हीसी कार्ड हे नवं कार्ड बाजारात आणलं.

पीव्हीसी आधार कार्डचे फायदे

– पीव्हीसी कार्डची गुणवत्ता चांगली असल्याने ते दीर्घकाळ टीकेल आणि पाकीटात सहजपणे ठेवता येते
– पीव्हीसी कार्डमध्ये लॅमिनेशन केलं जात असल्यानं छापील माहिती देखील सुरक्षित राहते.
– आधार पीव्हीसी कार्डमध्ये होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्टसारखे सिक्यूरिटी फिचर्स देखील असतात.
– पीव्हीसी आधार कार्डद्वारे तुम्ही क्यूआर कोडच्या माध्यमातून तातडीने ऑफलाईन व्हेरिफिकेशन करता येतं.
– हे कार्ड ऑनलाईन ऑर्डर करु शकता. यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागते.