Aadhaar-Mobile Number Update | आधारकार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट कसा कराल ?; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aadhaar Mobile Number Update | देशातील नागरीकाचे सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड (Aadhaar Cards) आहे. खासगी आणि सरकारी कामामध्ये आधार कार्डची खूप आवश्यकता असते. आधार कार्डशिवाय कोणतेही कामे पूर्ण होत नाहीत. आधार तयार करताना मोबाईल नंबर (Mobile Number) नोंदवावा लागतो. दरम्यान, अनेकदा लोक आधार तयार झाल्यावर मोबाईल नंबर बदलतात. त्यामुळे त्यांना नोटिफिकेशन (Notification) मिळणे बंद होते.

 

आधार क्रमांक मोबाईल क्रमाकांशी जोडला (Aadhaar-Mobile Number Update) नसल्यामुळे अनेकवेळा आपले काम तसेच प्रलंबित राहतात. मात्र आता काळजी करण्याचं काम नाही. कारण आपण आता घरबसल्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करू शकणार आहात. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI पोर्टल Ask.uidai.gov.in वर जावे लागणार आहे. आणि प्रक्रियाच्या माध्यमातून अपडेट करावे लागणार आहे.

 

जाणून घ्या प्रक्रिया –

जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.

आधार अपडेट/सुधारणा फॉर्म भरा.

आधार एक्जिक्युटिव्ह कडे फॉर्म सबमिट करा.

तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

तुम्हाला एक पावती दिली जाईल, ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. अपडेट विनंतीची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

तुमचा मोबाईल नंबर 90 दिवसांच्या आत आधारच्या डेटाबेसमध्ये अपडेट केला जाईल.

 

दरम्यान, आधार कार्डमध्ये (Aadhaar Cards) तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागणार आहे. अनेकदा लोकांचे मोबाईल हरवतात अथवा काही कारणास्तव नंबर निष्क्रिय होतात. जर तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल, तर तुम्ही तो यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India (UIDAI) च्या डेटाबेसमध्ये अपडेट करू शकणार आहात.

 

Web Title :- Aadhaar-Mobile Number Update | how to change your mobile number in aadhaar card check process

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा