सरकारचा मोठा निर्णय! आता या कामांसाठी आवश्यक नाही Aadhaar Card

नवी दिल्ली : सरकारने पेन्शनधारक ज्येष्ठांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला मिळवण्याबाबत नवीन नियम अधिसूचित केले आहेत. आता पेन्शनधारकांना डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आधार ऐच्छिक करण्यात आले आहे. सरकारने सुशासन संचालन (सामाजिक कल्याण, नवोन्मेष, ज्ञान) निमय 2020 अंतर्गत आपले त्वरित संदेश तक्रार निवारण अ‍ॅप ‘संदेश’ आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आधार प्रमाणीकरण ऐच्छिक केले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाद्वारे 18 मार्चला जारी अधिसूचनेत म्हटले आहे की, जीवन प्रमाणपत्रासाठी आधारची आवश्यकता ऐच्छिक आधारावर असेल आणि याचा वापर करणार्‍या संघटनांना जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी पर्यायी पद्धती काढल्या पाहिजेत. या प्रकरणात एनआयसीला आधार कायदा 2016, आधार नियमन 2016 आणि कार्यालय निवेदन तसेच यूआयडीएआयद्वारे वेळोवेळी जारी सक्युर्लर आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागेल.

पेन्शनर्ससाठी लाँच झाले डिजिटल लाईफ सर्टिफिकेट
पेन्शनर्ससाठी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक ज्येष्ठांना आपण जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी दूरच्या ठिकाणी जाऊन पेन्शन वितरित करणार्‍या संस्थेच्या समोर उपस्थित राहावे लागत होते. किंवा जिथे नोकरी करत होते तेथून त्यांना जीवन प्रमाणपत्र घ्यावे लागत होते आणि ते पेन्शन वितरण एजन्सीकडे जमा करावे लागत होते. आता डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्राची सुविधा मिळाल्याने पेन्शनर्सला दिलासा मिळाला आहे.

परंतु, अनेक पेन्शनर्सने या बाबतीत तक्रारी केल्या आहेत की, आधार कार्ड नसल्याने त्यांन पेन्शन मिळण्यात अडचणी येत आहेत किंवा त्यांच्या अंगठ्याची निशाणी जुळत नाही. यासाठी काही सरकारी संघटनांनी 2018 मध्ये पर्यायी मार्ग काढला होता तर आता जारी अधिसूचनेद्वारे आधारला डिजिटल जीवन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ऐच्छिक केले आहे.

संदेश अ‍ॅपमध्ये आधार झाले पर्यायी
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे विकसित इन्स्टंट मॅसेजिंग सोल्यूशन संदेश अ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी आधारला पर्यायी बनवले आहे. संदेशमध्ये आधार प्रमाणीकरण ऐच्छिक आधारावर आहे आणि वापरकर्ता संघटनेचे सत्यतेचे पर्यायी साधन पदान करतील.