Aadhaar-PAN Card Center on Railways Station | रेल्वे स्टेशनवर सुद्धा बनवू शकता Aadhaar आणि PAN Card, सुरू झाली ‘ही’ सर्व्हिस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar-PAN Card Center on Railways Station | तुम्हाला आधार कार्ड (Aadhaar Card) बनवायचे असेल किंवा ते अपडेट करायचे असेल किंवा पॅन कार्ड (PAN Card) शी संबंधित काही काम असल्यास, तुम्ही हे काम तुमच्या जवळच्या रेल्वे स्थानकावर करून घेऊ शकता. कारण लवकरच लोकांना रेल्वे स्थानकावर कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे दिल्या जाणार्‍या सेवांचा लाभ मिळणार आहे. (Aadhaar-PAN Card Center on Railways Station)

प्रायोगिक तत्त्वावर प्रथम वाराणसी सिटी रेल्वे स्टेशन (Varanasi Railway Station) आणि प्रयागराज सिटी रेल्वे स्टेशन (Prayagraj Railway Station) वर कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

रेलवायर साथी किओस्क (Railwire Sathi Kiosk)

वाराणसी आणि प्रयागराजनंतर देशातील इतर रेल्वे स्थानकांवरही कॉमन सर्व्हिस सेंटरसारखे किओस्क सुरू होणार आहेत. या किओस्कना रेलवायर साथी किओस्क (Railwire Saathi KIOSK) असे नाव देण्यात आले आहे. हे किओस्क सेवा केंद्र ग्रामस्तरीय उद्योजक (VLEs) चालवतील.

तुम्ही या कॉमन सर्व्हिस सेंटरवर ट्रेन, विमान किंवा बस तिकीट बुक करू शकता. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड, मोबाईल रिचार्ज, वीज बिल भरणा, प्राप्तीकर, बँकिंग आणि विमा संबंधित कामेही करता येतील. (Aadhaar-PAN Card Center on Railways Station)

200 रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार सुविधा

RailTel सुमारे 200 रेल्वे स्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर (common service center) किओस्क चालवेल.
यापैकी 44 दक्षिण मध्य रेल्वेमध्ये, 20 ईशान्य सीमा रेल्वेमध्ये, 13 पूर्व मध्य रेल्वेमध्ये, 15 पश्चिम रेल्वेमध्ये, 25 उत्तर रेल्वेमध्ये, 12 पश्चिम मध्य रेल्वेमध्ये, 13 पूर्व कोस्टल रेल्वेमध्ये आणि 56 ईशान्य रेल्वेमध्ये आहेत.

ही योजना CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडच्या भागीदारीत चालवली जात आहेत. रेल्वे स्थानकांवर ये-जा करणार्‍या लोकांसाठी ही मोठी सुविधा आहे.

RailTel, रेल्वे मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने संपूर्ण भारतातील रेल्वे स्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किओस्क चालवण्याची योजना सुरू केली आहे.
ही योजना भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CSC-SPV) च्या भागीदारीत चालवली जात आहे.

अधिकारी काय म्हणतात

RailTel 6000 हून अधिक स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरवते.
RailTel चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी सांगितले की,
ग्रामीण भागातील लोकांना अनेक वेळा विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे किंवा डिजिटलायझेशन सुविधांचा लाभ घेणे अवघड जाते.

कारण पायाभूत सुविधा आणि संसाधनांचा अभाव तसेच इंटरनेट वापराचे ज्ञान नसल्यामुळे असे घडते.
हे Railwire Sathi KIOSK ग्रामीण लोकसंख्येला मदत करण्यासाठी या आवश्यक डिजिटल सेवा ग्रामीण रेल्वे स्थानकांवर आणतील.

सीएससी-एसपीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश कुमार त्यागी म्हणाले की, दुर्गम खेड्यांमध्ये कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ग्रामीण भारतात डिजिटल सेवा पोहोचण्यात अनेकदा अडथळे येतात.
रेल्वे स्थानकांवर RailTel च्या Wi-Fi आणि Kiosk (KIOSK) इन्फ्रास्टक्चरच्या सुविधांमुळे गावपातळीवरील उद्योजक आमची सेवा जनतेपर्यंत पोहोचवू शकतील.

Web Title :-  Aadhaar-PAN Card Center on Railways Station | aadhaar card and pan card center on railways station railtel railwire saathi kiosk common service center

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव

 

Policeman Murder News | पोलीस हवालदाराच्या डोक्यात खलबत्ता घालून खून

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे उघडा अकाऊंट, दर महिना मिळेल 2500 रुपयांची उत्पन्न; जाणून घ्या