Aadhaar-PAN Link | ‘या’ व्यक्तींसाठी आधार पॅनशी लिंक करण्याची आवश्यकता नाही; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar-PAN Link | देशातील नागरीकांचे एक महत्वाचे कागदपत्रं म्हणून आधार कार्डकडे (Aadhaar Card) पाहिले जातेय. दरम्यान आधार कार्ड अपडेट बाबत सरकार सतत सुचना देत असते. मार्च अखेर महिना संपत आला असतानाच आर्थिक व्यवहाराबाबत अनेक महत्वाचे काम पेडींग राहिले असते. ते कामे पुर्ण करणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे आधार कार्ड पॅन (PAN Card) कार्डशी लिंक (Aadhaar-PAN Link) करण्याचेही कोणाचे काम अपुरे राहिले असते. त्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.

 

दरम्यान, आधार कार्ड – पॅन कार्डशी लिंक करण्यासाठी अखेरची तारीख 31 मार्च आहे. म्हणून आगामी मुदतवाढ मिळण्याची प्रतिक्षा न करता तात्काळ याबाबत कामे उरकून घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या दरम्यान, आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलम 139AA नुसार, आधार कार्ड – पॅन कार्ड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला 31 मार्च 2022 आधी आधार पॅनशी लिंक करावे लागणार आहे. दरम्यान महत्वाचे म्हणजे असेही काही नागरीक आहेत ज्यांना आधार आणि पॅन लिंक करण्याची आवश्यकता नाही. (Aadhaar-PAN Link)

 

‘या’ लोकांसाठी PAN – Aadhaar Link करण्याची आवश्यकता नाही –

ज्यांच्याकडे Aadhaar Number किंवा Enrollment ID नाही.

आसाम, जम्मू – काश्मीर आणि मेघालयातील रहिवाशांना याची गरज नाही.

Income Tax Act 1961 नुसार अनिवासींसाठी अनिवार्य नाही.

80 वर्षांवरील नागरिकांसाठी आवश्यक नाही.

जे भारताचे नागरिक नाहीत त्यांना याची गरज नाही.

 

Web Title :- Aadhaar-PAN Link | aadhaar pan linking is not mandatory for all read who all are exempt

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा