‘एकदम मोफत’ घ्यायचे असेल ‘रेशन’ तर घरबसल्या लिंक करा Aadhaar-Ration Card, मिळतील अनेक जबरदस्त फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar-Ration Card | तुम्ही सरकारकडून दिल्या जाणार्‍या मोफत रेशन (Ration) साठी पात्र असाल आणि तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ते नक्कीच आधार (Aadhaar) शी लिंक करा. आधार कार्डच्या मदतीने रेशAadhaar-Ration Cardनकार्ड ग्राहकांना थेट लाभ मिळत आहे. कोरोनानंतर सरकारने रेशनकारर्ड धारकांसाठी ’वन नेशन वन रेशन कार्ड’ सुरू केले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात राहून रेशन घेऊ शकता. (Aadhaar-Ration Card)

 

मात्र यासाठी तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक (Aadhaar-Ration Link) करावे लागेल. त्यामुळे जर तुम्ही अद्याप आधार-रेशन लिंक केले नसेल, तर आता तुम्ही हे काम घरी बसून सहज करू शकता. आधार-रेशन कार्ड लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या…

 

ऑनलाइन लिंक करा Aadhaar-Ration Card

1. यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. आता तुम्ही ’Start Now’ वर क्लिक करा.

3. आता येथे जिल्हा, राज्य नोंदवा.

4. यानंतर ’रेशन कार्ड बेनिफिट’ या पर्यायावर क्लिक करा.

5. आता येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा.

6. ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

7. येथे ओटीपी भरल्यानंतर, स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.

8. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचे आधार पडताळले जाईल आणि आधार तुमच्या रेशनकार्डशी लिंक केले जाईल.

शिधापत्रिकाधारकांसाठी ’मेरा रेशन अ‍ॅप’ फायदेशीर

मेरा रेशन अ‍ॅपच्या मदतीने रेशन कार्डसाठी नोंदणी करता येते. याशिवाय रेशनकार्ड डाऊनलोड करता येते. तुमचे रेशन आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे देखील तपासले जाऊ शकते, तसेच लिंक करता येते.

 

याशिवाय तुमच्या रेशनकार्डवर आतापर्यंत किती वितरण झाले आहे आणि तुमच्या घराजवळ रेशन डीलरचे दुकान कुठे आहे, हेही तपासता येईल. तुम्हाला रेशन डीलर बदलायचा असेल तर ही सुविधा या मोबाईल अ‍ॅपवरही उपलब्ध आहे. ही सर्व वैशिष्ट्ये या अ‍ॅपवर 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

 

Web Title :- Aadhaar-Ration Card | want to get free ration everywhere in india than link aadhaar and ration card online check easy process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC IPO | देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी लगबग, डेडलाईनच्या पूर्वी दिवसरात्र एक करताहेत अधिकारी

 

Raima Islam Shimu | प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू बांगलादेशात बेपत्ता, पोत्यात सापडला मृतदेह

 

Pankaja Munde vs Dhananjay Munde | बीडमध्ये भाजपचं वर्चस्वं ! पंकजा ताईंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’; निकालानंतर धनंजय मुंडेंवर निशाणा…