‘आधार’कार्ड वरील ‘पत्ता’ बदलण्याच्या आणि बँकेत ‘अकाऊंट’ उघडण्याच्या प्रक्रियेत सरकारकडून ‘बदल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी आधारकार्ड सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. अनेक सरकारी योजनांसाठी हे ओळखपत्र फार महत्वाचे असून वेळोवेळी सरकारने यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यानंतर आता सरकारने यामध्ये नवीन सुधारणा आणली असून तुम्ही आधारकार्डवरील तुमचा पत्ता सहज बदलू शकता. जर तुम्ही एखाद्या कामासाठी आधारकार्ड वापरात असाल आणि तुम्हाला पत्ता दुसरा द्यायचा असेल तर तुम्ही self declaration देऊन तुमचा दुसरा पत्ता देऊ शकता.

सरकारच्या या निर्णयामुळे सतत स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून त्यांना यामध्ये हवा तसा बदल करता येणार आहे. Prevention of Money-laundering (Maintenance of Records या कायद्याअंतर्गत हा बदल केला गेला आहे. त्यामुळे आता तुम्ही आधारकार्ड व्यतिरिक्त दुसरा पत्ता देखील देऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ self declaration देण्याची गरज आहे. या बदलाची मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती.

या लोकांना होणार मोठा फायदा
आधारकार्डसंबंधी घेतलेल्या या निर्णयाचा प्रवासी मजुरांना मोठा फायदा होणार असून त्यांना मूळ पत्त्याव्यतिरिक्त दुसरा पत्ता देखील देता येणार आहे. त्यामुळे आता यापुढे त्यांना निवासी पत्ता देखील देता येणार असल्यामुळे त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like