कामाची गोष्ट ! Aadhaar चं मोबाइल अँप देईल 35 पेक्षा जास्त सुविधा; UIDAI नं लाँच केलं mAadhaar चं नवं ‘व्हर्जन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही आधार Aadhaar कार्डशी संबंधीत 35 सेवांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही आाधर Aadhaar कार्ड डाऊनलोड करू शकता, आधार कार्डचे स्टेटस जाणून घेवू शकता, आधार Aadhaar कार्ड रि-प्रिंट करू शकता, आधार केंद्राचे लोकेशन जाणून घेवू शकता आणि अशा अनेक सेवा आहेत ज्या मोबाइलवर मिळवू शकता.

स्मार्टफोनवर मिळतात आधारच्या 35 सेवा
आधार एक असे डॉक्युमेंट आहे ज्याच्या गरज सतत लागते, याच्याशिवाय तुम्ही सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

युनिकआयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने घोषणा केली आहे की, स्मार्टफोन असलेल्या आधार कार्डधारकांना आता 35 पेक्षा जास्त सेवा मिळू शकतात.

आधार होल्डरसाठी पर्सनलाइज्ड सेक्शन
एमआधार अ‍ॅपमध्ये आधार सेवांची एक मालिका आहे.
आणि आधार होल्डरसाठी पर्सनाइज्ड सेक्शन सुद्धा आहे जे आधारची माहिती सॉफ्ट कॉपी म्हणून ठेवते,
फिजिकल कॉपी सतत सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही.

mAadhaar app असे करा डाऊनलोड

1. अँड्रॉईड फोन यूजर्सने लिंक https://tinyurl.com/yx32kkeq वर क्लिक करावे किंवा डायरेक्ट लिंक https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.mAadhaarPlus&hl=en_IN. ओपन करा.

2. यानंतर फोन यूजर्सच्या समोर एक दुसरे पेज ओपन होईल,
जिथे इन्स्टॉल बटनचे ऑपशन दिसेल, त्यावर क्लिक करा,
थोड्या वेळात अ‍ॅप डाऊनलोड होईल.
तुम्ही तुमची माहिती भरून हे अ‍ॅप वापरू शकता.

3. आयओएस स्मार्टफोन यूजर्स एमआधार अ‍ॅप या लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करू शकतात – https://tinyurl.com/taj87tg किंवा डायरेक्ट https://apps.apple.com/in/app/maadhaar/id1435469474 वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

लक्षात ठेवा की आधारचे कोणतेही फेक अ‍ॅप चुकूनही डाऊनलोड करू नका.
यासाठी युआयडीएआयकडून दिलेल्या या लिंकद्वारे अधिकृत आधार अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

युआयएडीएने ट्विटरवर ही माहिती दिली आहे की, आधार कार्डहोल्डरने आपल्या मोबाईवरून जुने एमआधार हटवून नवीन व्हर्जन डाऊनलोड करावे, यातून त्यांचा अनुभव आणखा चांगला होईल आणि जास्त सेवा मिळतील.

 

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

PM मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी साधला निशाणा, म्हणाले…

 

संतापजनक ! 70 वर्षाच्या नराधमाकडून 10 वर्षाच्या मुलीवर घरात घुसून लैगिंक अत्याचार, कोंढव्यातील घटना