तुमच्या Aadhaar द्वारे किती मोबाइल नंबर आहेत रजिस्टर्ड? ‘या’ वेबसाइटवरून तपासा; 2 राज्यांमध्ये मिळेल विशेष सुविधा

नवी दिल्ली : Aadhaar | तुमच्या आधार कार्ड (Aadhaar card) द्वारे किती मोबाइल नंबर रजिस्टर्ड आहेत हे तुम्ही विसरला आहात का? जर असे असेल तर अजिबात अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या हे तपासू शकता. दूरसंचार विभाग (DoT) ने नुकतेच एक पोर्टल लाँच केले आहे, ज्याच्या वापराने तुम्ही हे चेक करू शकता की एका आधार कार्डवर किती मोबाइल नंबर नोंदणीकृत आहेत. टेलीकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) च्या वेबसाइटवर जाऊन हे चेक करू शकता.

दोन राज्यात सुरू झाली सर्व्हिस

याद्वारे त्या नंबरचा शोध घेतला जाऊ शकतो जे नंबर कुणाचेही नाहीत किंवा ज्याचा कुणी वापर करत नाहीत. असे नंबर बंद सुद्धा करता येऊ शकतात. सध्या या सुविधेचा वापर केवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे यूजर्स करू शकतात.

आधार कार्डद्वारे रजिस्टर्ड फोन नंबर असे चेक करा (phone numbers registered against the Aadhaar number)

– सर्वप्रथम दूरसंचार विभागाचे पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in वर व्हिजिट करा.

– येथे 10 अंकी मोबाइल नंबर नोंदवा.

– यानंतर मोबाइल नंबर व्हेरिफिकेशनसाठी मोबाइलवर ओटीपी येईल.

– हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय होईल.

– तुमच्या सर्कलमध्ये सुविधा उपलब्ध असेल तर व्हेरिफिकेशन नंतर सर्व मोबाईल नंबरची लिस्ट येईल, जे तुमच्या आयडीवर सुरू आहेत.

– जर तुम्हाला वाटत असेल की एखादा नंबर असा आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही तर त्या नंबरची तक्रार याच पोर्टलवर करू शकता.

– सरकार तुम्ही सांगितलेल्या नंबरची चौकशी करेल.

– जर नंबर तुमच्या आयडीवर चालत असल्याचे आढळले तर तो ब्लॉक केला जाईल.

– ही प्रकिया तुम्हाला पुढील सर्व संभाव्य नुकसानापासून वाचवू शकते.

हे देखील वाचा

Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘संजय राऊतांमुळे शिवसेना खड्डयात, ‘सामना’वर ‘प्रहार’ करणार (व्हिडीओ)

EPFO | आधार-पॅन ईपीएफओला जोडण्याच्या सुविधेत कोणताही अडथळा नाही सर्व सेवा स्थिर – UIDAI

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  aadhaar service 2 states allow verifying mobile numbers linked with aadhaar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update