Aadhaar Services | आता पोस्टमनद्वारे करू शकता आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट; इंडियन पोस्ट पेमेंट बँक देतंय सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : Aadhaar Services | सध्या आधार कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात आवश्यक कागदपत्रांपैकी आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारची आवश्यकता असते. आधारसंबंधीत कोणतेही काम करताना आधारसोबत लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येतो. यामुळे मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक असते. जर तुमचा नंबर बदलला असेल किंवा लिंक नसेल तर ऑनलाइन किवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे नंबर आधारसोबत अपडेट (Aadhaar Services) करू शकता.

याशिवाय तुम्ही पोस्टमन किंवा ग्रामीण पोस्ट सेवेची मदत घेऊन सुद्धा मोबाइल नंबर आधारसोबत अपडेट करू शकता.
यासाठी सेवा शुल्क घेतले जाणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने (Indian Post Payment Bank) एक ट्विट करत ही माहिती दिली आहे (you can update mobile number in Aadhaar through Postman).

या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आधारवर लिंक मोबाइल नंबरद्वारेच आपण अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतो. उदाहरणार्थ याद्वारे, आधारमध्ये ऑनलाइन नाव, जन्म तारीख, जेंडर (लिंग), आणि पत्ता अपडेट करू शकतो. अनेक सरकारी योजनांमध्ये रजिस्ट्रेशन करता येते.

तसेच, एक देश एक रेशन कार्ड योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO सर्व्हिस घेऊ शकता.
याशिवाय आधारवर नंबर अपडेट करून EPFO संबंधी सेवा आणि इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग सारख्या सेवांचा लाभ (Aadhaar Services) घेऊ शकतो.

यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयात जा, किंवा आपल्या स्थानिक पोस्टमनसोबत संपर्क साधा.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढीचा आलेख अजूनही चढताच

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Aadhaar Services | aadhaar services now you can update mobile number in aadhaar through postman indian post payment bank is providing the facility

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update