Aadhaar Shila Policy | महिलांना आर्थिक मजबूती देते LIC ची ‘ही’ पॉलिसी, कमी गुंतवणुकीत मिळतो लाखोंचा फायदा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Shila Policy | महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार नेहमी पाठपुरवा करत असते. अशावेळी एलआयसीने सुद्धा महिलांना आर्थिक मजबूती देण्यासाठी आधारशिला पॉलिसी (Aadhaar Shila Policy) ची सुरुवात 2017 मध्ये केली. ज्यामध्ये खुप कमी गुंतवणूक करून एक चांगला रिटर्न मिळवता येऊ शकतो.

 

तुम्हाला सुद्धा छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी एलआयसीची आधारशिला पॉलिसी एक चांगला पर्याय होऊ शकतो. या पॉलिसीबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

केवळ महिलांसाठी आहे ही योजना (Aadhaar Shila Policy for Womens Only) –
LIC ची आधारशिला पॉलिसी केवळ महिलांसाठी आहे. ज्यामध्ये 8 वर्षाच्या वयापासून 55 वर्षाच्या वयापर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. जसे की या पॉलिसीत कुणीही महिला किमान 75 हजार रुपये आणि कमाल 3 लाख रुपयांपर्यंत विमा खरेदी करू शकते.

या योजनेत तुम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करू शकता.
या स्कीमच्या अंतर्गत तुम्ही किमान 10 वर्ष आणि जास्तीत जास्त 20 वर्षासाठी गुंतवणूक करूशकता.
जर तुम्ही 20 वर्षापर्यंत दरमहिना 899 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षी तुमचे केवळ 10,959 रुपयेच जमा होतील.
यावर तुम्हाला 4.5 टक्के टॅक्स सुद्धा द्यावा लागेल. (Aadhaar Shila Policy)

 

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळतो फायदा –
आधारशिला स्कीम खरेदी करणार्‍या महिलेचा जर दुर्दैवाने मृत्यू झाला तर,
या स्थितीत तिच्या घरच्या सदस्यांना ठरलेली रक्कम दिली जाते.
तसेच या योजनेत इन्कम टॅक्समध्ये कोणतीही सूट मिळत नाही.

 

मॅच्युरिटीवर मिळेल इतका रिटर्न –
जर तुम्ही 20 वर्षापर्यंत दरमहिना 899 रुपये जमा केले तर 20 वर्षात एकुण 2 लाख 14 हजार रुपये तुमची गुंतवणूक होईल.
ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युर झाल्यानंतर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील.
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून महिला आपले भविष्य सुरक्षित करू शकतात.
आणि 20 वर्षानंतर एक मोठी रक्कम जमवू शकतात.

 

Web Title :- Aadhaar Shila Policy | lic policy gives financial strength to women benefits of lakhs are available in less investment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Variant | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आज फेरविचार?

Pune Crime | कंपनीतून बेकायदेशीरपणे पैसे काढून देण्यास विरोध; कंपनी मालकाची बहिण, आई वडिलांनी केली महिलेची सोशल मिडियात बदनामी

Crude Oil Prices | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रभाव, LPG सिलेंडरपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत होऊ शकते स्वस्त