Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Update | आधारकार्डप्रमाणेच आता तुमच्या जमिनीचाही आधार क्रमांक (Aadhaar Number) दिला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. वन नेशन, वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत (One Nation, One Registration Programme) केंद्र सरकार (Central government) जमिनींसाठी एक युनिक रजिस्ट्रेशन नंबर (Unique registered number for lands) जारी करणार आहे. (Aadhaar Update)

 

सरकार घेणार आयपी आधारित तंत्रज्ञानाची मदत
मंगळवारी संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Union Budget 2022) मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आता देशाच्या जमिनीचा डिजिटल रेकॉर्ड (Digital Land Record) देखील तयार केला जाईल. हे आयपी आधारित तंत्रज्ञानाच्या (IP Based Technology) मदतीने केले जाईल.

 

निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की सरकारने मार्च 2023 पर्यंत देशभरातील जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जमिनीच्या कागदपत्रांच्या आधारेच डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे. (Aadhaar Update)

 

डिजिटल लँड रेकॉर्डचे अनेक फायदे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, लँड रेकॉर्ड डिजीटल केल्यास अनेक फायदे होतील. 3सी फॉर्म्युल्यानुसार जमिनीचे वाटप केले जाईल, ज्याचा लाभ सर्व लोकांना मिळेल.

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 (Union Budget of India 2022) च्या प्रस्तावात म्हटले आहे की या कार्यक्रमाद्वारे सर्व रेकॉर्ड केंद्रीकृत केले जातील. सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. सरकारने ठरवलेल्या कार्यक्रमानुसार आता तुमच्या जमिनीचा 14 अंकी यूलपिन नंबर (ULPIN) म्हणजेच ’युनिक नंबर’ जारी केला जाईल.

जमीन खरेदी-विक्रीमध्ये येणार नाही अडचण
जमिनीचा आधार कार्ड (ULPIN) क्रमांक मिळाल्यानंतर जमीन खरेदी-विक्री करणे खूप सोपे होईल. या क्रमांकाच्या माध्यमातून देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. अर्थसंकल्पात आलेल्या प्रस्तावाबाबत म्हटले जात आहे की, लोकांना जमिनीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

 

जमीन विभाजनानंतर बदलेल आधार क्रमांक
जर जमिनीचे विभाजन झाले तर त्याचा आधार क्रमांक वेगळा होईल. जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड तयार झाल्यास कोणाच्याही जमिनीचे रेकॉर्ड पाहणे सोपे होणार आहे. जमिनीचे मोजमाप ड्रोन कॅमेर्‍याने केले जाणार असल्याने त्रुटींचे प्रमाण नगण्य असेल.

 

एका क्लिकवर पाहू शकाल लँड रेकॉर्ड
डिजिटल रेकॉर्ड तयार झाल्यानंतर जमिनीच्या नोंदी पाहण्यासाठी भूमी आणि महसूल विभागाच्या कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जमिनीची माहिती मिळू शकेल. सध्या देशात 140 मिलियन हेक्टर जमिनीवर शेती केली जात आहे. 125 मिलियन हेक्टर जमिन ठिक केली जात आहे.

 

2023 पर्यंत देशातील लँड रेकॉर्ड होईल डिजिटल
2023 पर्यंत देशभरातील लँड रेकॉर्ड डिजिटल करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
मार्च 2023 पर्यंत देशभरातील लँड रेकॉर्ड डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांत फक्त एका क्लिकवर तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे तुमच्यासमोर असतील.
तुम्हाला देशात कोणत्याही ठिकाणी तुमच्या जमिनीशी संबंधित माहिती मिळू शकेल.

 

Web Title :- Aadhaar Update | aadhaar update ip based digital land record ulpin number in one nation one registration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 14,372 नवीन रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Station Platform Ticket | पुणेकरांना दिलासा ! प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा 50 रूपयांवरून 10 रूपये

 

Ajit Pawar | ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधून सापडणार नाही’, अजीत पवारांची टीका