आता तुम्हाला तुमचं Aadhaar अपडेट करण्यासाठी द्यावे लागतील 100 रूपये, UIDAI ने दिली संपुर्ण माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्डवर फोटो अपडेट करणे महाग झाले आहे. फोटो अपडेट करण्यासाठी आता १०० रुपये फी असेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) बायोमेट्रिक अपडेट फी मध्ये ५० रुपयांची वाढ केली आहे. आतापर्यंत अपडेटसाठी ५० रुपये शुल्क निश्चित केले गेले होते. यूआयडीएआयने एका ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, बायोमेट्रिक्स अपडेटसह आता एक किंवा अधिक अपडेट्ससाठी १०० फी रुपये असेल. सध्या यूआयडीएआय आधारमध्ये डेमोग्राफिक डिटेल अपडेटसाठी ५० रुपये घेते.

या सेवांचे शुल्क वाढले
आधार सेवा सुरू होताच बायोमेट्रिक अपडेट फी वाढली आहे. डेमोग्राफिक अपडेट शुल्क वाढलेले नाही. डोळ्यातील बुबुळं (आयरिस) आणि फिंगरप्रिंट्ससुद्धा अपडेट केल्या जातात. एखाद्याचे फिंगरप्रिंट न मिळाल्यासही त्या व्यक्तीला पुन्हा बायोमेट्रिक अपडेट करावे लागते. याची फी १०० रुपये झाली आहे. तर नाव, पत्ता, वय, मोबाइल नंबर आणि ई-मेलसाठी पूर्वीप्रमाणे ५० रुपये द्यावे लागतील.

यूआयडीएआयने सांगितले आहे की, अर्ज फॉर्म आणि फी सोबतच नाव, पत्ता किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला वैध कागदपत्रे जमा करावी लागतील. यूआयडीएआय ओळखपत्र म्हणून ३२ कागदपत्रे स्वीकारतो.

अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून ४५ कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून १५ कागदपत्रे स्वीकारतात. तुमच्या आधारमधील माहिती बदलण्यासाठी तुम्ही कोणताही एक वैध पुरावा जमा करू शकता.

आधारमधील सर्व बदलांसाठी तुम्हाला सत्यापनासाठी कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईल क्रमांकाला आधार कार्डशिवाय कोणतेही कागदपत्र जमा न करता अपडेट करू शकता.

तुम्ही कोणत्याही कागदपत्रांसह तुमचा नवीन फोटो अपडेट करू शकता. इतर तपशील म्हणजे बायोमेट्रिक्स, लिंग आणि ईमेल आयडी देखील कोणत्याही अडचणीशिवाय अपडेट करू शकता.