Aadhaar verify | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल ‘आधार’, फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Aadhaar verify | महत्वाचे कागदपत्र असलेले आधार कार्ड सुरक्षित ठेवले पाहिजे. अनेकदा त्याचा गैरवापर होतो. ज्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन आधार व्हेरिफाय (Aadhaar verify) करणे आवश्यक आहे. UIDAI ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा. कोणतेही आधार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पडताळणीस पात्र आहे. ऑफलाइन पडताळणीसाठी, ई-आधार किंवा आधार पत्र किंवा आधार पीव्हीसीकार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करा.

ऑनलाइन पडताळणीसाठी, https://resident.uidai.gov.in/verify लिंकवर जाऊन 12 अंकी आधार नंबर नोंदवा, तुम्ही यासाठी Aadhaar अ‍ॅपचा वापर सुद्धा करू शकता. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करा किंवा [email protected] वर मेल करा.

काय आहे पूर्ण प्रोसेस

ऑनलाइन आधार व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://resident.uidai.gov.in/verify वर जावे लागेल. तिथे 12 अंकाचा आधार नंबर नोंदवा.
नंतर कॅप्चा व्हेरिफिकेशन पर्यायावर जाऊन तिथे दिलेला कॅप्चा कोड भरून प्रोसीड टू व्हेरिफायच्या ऑपशनवर क्लिक करा.
इतके केल्यानंतर आधार व्हेरिफाय होईल.

 

Web Title : Aadhaar verify | aadhaar will be verified online from home follow this easy process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tuljapur Crime | खोटे सोने तारण ठेऊन बँकेला लाखोंचा गंडा, 4 जणांना अटक

Pune Crime | सोसायटीच्या वर्गणीवरुन दोन कुटुंबात तुफान राडा, 5 जणांवर FIR

MLA Gopichand Padalkar | श्री. मार्तंड देवस्थानचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘आमदार पडळकरांचे वक्तव्य बेजबाबदार, राजकीय आकसापोटी केलेले’