Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

नवी दिल्ली : प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आता आवश्यक झाले आहे. अनेक लोक आधार कार्ड सोबत घेऊन बाहेर फिरतात. परंतु, आता तुम्ही तुमचे आधार कार्ड खिशात किंवा पर्समध्ये न ठेवता आपल्या फोनमध्ये ठेवू (Aadhaar Virtual Id) शकता. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आधार कार्डचे व्हर्च्युअल आयडी (Aadhaar Virtual Id) जारी करते. हे व्हर्च्युअल आयडी UIDAI वेबसाइटवरून बनवता येते. व्हर्च्युअल आयडी काय आहे आणि ते कसे बनवायचे ते जाणून घेवूयात…

आधार व्हर्च्युअल आयडी

– व्हर्च्युअल आयडी 16 डिजिटचा नंबर असतो.

– या नंबरला आधारचा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो.

– हे बँकिंगपासून सर्व प्रकारच्या सुविधांसाठी मान्य आहे.

– याची वैधता एक दिवसासाठीच सांगितली जाते, परंतु जोपर्यंत यूजर दूसरा Virtual ID तयार करत नाहीत तोपर्यंत हा वैध राहतो.

– आधार व्हर्च्युअल आयडीच्या वैधतेबाबत सध्या कोणताही कालावधी ठरलेला नाही.

असा जनरेट करा आधार व्हर्च्युअल आयडी

– UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://www.uidai.gov.in. वर जा.

– लॉगइन करा आणि आधार सर्व्हिसमध्ये जा. येथे व्हर्च्युअल आयडीवर क्लिक करा.

– आता एक पेज ओपन होईल, त्यामध्ये 16 डिजिटचा आधार नंबर नोंदवा.

– यानंतर सिक्युरिटी कोड टाकून OTP जनरेट करा.

– OTP रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल.

– ओटीपी सबमिट करा आणि Generate VID ऑपशनवर क्लिक करा.

– नंतर व्हर्च्युअल आयडी जनरेट झाल्याचा मेसेज येईल.

हे देखील वाचा

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण

ESIC Covid Benefits | लाखो कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! कोरोनाने मृत्यू झाला तर आई, पत्नी, मुलगा, मुलगी सर्वांना मिळेल पेन्शन; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Aadhaar Virtual Id | create aadhaar virtual id in minutes and do the necessary work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update