Aadhar Card | जुने झाले असेल आधार कार्ड तर लवकर करा अपडेट, अडकू शकतात अनेक कामं, UIDAI ने सांगितली ही गोष्ट

नवी दिल्ली : तुमचे आधार कार्ड (Aadhar Card Updates) खूप जुने झाले असेल तर ते अपडेट करावे लागेल. खरं तर, आधार कार्ड अपडेटबाबत, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) म्हणणे आहे की ज्यांचे आधार कार्ड १० वर्षांहून जास्त जुने आहे त्यांनी आपली माहिती अपडेट (Aadhar Card) करणे खूप महत्वाचे आहे.

यूआयडीएआय म्हणते की जर कार्डशी संबंधित कोणतीही माहिती जसे की पत्ता, स्टेटस, आडनाव बदलले असेल तर ते डेटाबेसमध्ये देखील अपडेट करणे आवश्यक आहे.

१० वर्षे जुने कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे :
आधार कार्ड अपडेटबाबत युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चे म्हणणे आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड १० वर्षांपेक्षा जुने झाले असेल तर ते आधार अपडेट करणे आवश्यक आहे. आधार अपडेट न केल्यामुळे अनेक सरकारी सुविधा मिळण्यात अडचण येऊ शकते.

आधारशी जोडल्या आहेत ११०० सरकारी योजना :
आधार कार्डच्या मदतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून सुमारे ११०० योजना राबवतात. या योजनांच्या लाभाथ्र्यांचे आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत. याशिवाय बँकांसह इतर अनेक वित्तीय संस्था सुविधा देण्यासाठी आधार कार्डचा वापर करतात. अशावेळी ज्यांनी गेल्या १० वर्षांपासून एकदाही आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांनी त्यांचे आधार कार्ड एकदा अपडेट करावे, असे यूआयडीएआयने म्हटले आहे. (Aadhar Card)

विशेष म्हणजे आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
आर्थिक व्यवहारांमध्ये, बँक खाती उघडण्यासह इतर अनेक कामांमध्ये पॅनसोबत आधार आवश्यक आहे.
अशावेळी आधार अपडेट ठेवणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करायचे असेल तर तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये
करू शकता. जर तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करायचे असेल तर तुम्ही myaadhaar पोर्टलला भेट देऊन ते अपडेट करू शकता.

Web Title :- Aadhar Card | aadhaar card has become old so get it updated soon uidai said this part

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

EPFO Alert | ६ कोटीपेक्षा जास्त लोकांना दिली महत्वाची माहिती, अजिबात करू नका हे काम

Devendra Fadnavis | पुणे शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागात ग्राहकांना सदोष वीज देयके, देवेंद्र फडणवीसांची कबुली; अभियंत्यांवर कारवाई सुरु