Aadhaar Card होल्डर्ससाठी मोठी अपडेट ! UIDAI ने दिली माहिती; सर्व यूजर्सवर होणार लागू

नवी दिल्ली : Aadhaar Card | आधार कार्ड यूजर्ससाठी कामाची बातमी आहे. UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी (Aadhaar Card) मोठे अपडेट दिले आहे. आता आधार कार्ड हरवल्यास अस्वस्थ होण्याची गरज नाही. युआयडीएआयने आधार डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे आणि यासोबत एक थेट लिंक सुद्धा शेयर केली आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही कधीही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

 

युआयडीएआयने केले ट्विट

युआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या सुविधेची माहिती दिली आहे. आधार सध्या आपल्या ओळखीचे महत्वाचे कागदपत्र आहे. बँकेचे काम असो की सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज भासते. यामुळे आता आधार सोबत ठेवणे किंवा त्याच्या संबंधी समस्या दूर करू शकता.

 

Aadhaar Card ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक शेयर करत युआयडीएआयने ट्विट केले की, आपले आधार https://eaadhaar.uidai.gov.in वरून कधीही कुठूनही डाऊनलोड करा. तुम्ही ‘नियमित आधार’ डाऊनलोड करणे निवडू शकता.

 

असे करा डाऊनलोड

आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही युआयडीएआयने दिलेली थेट लिंक – eaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा. यानंतर ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करा. यानंतर काही स्टेपचे पालन करून तुम्ही तुमचे आधार डाऊनलोड करू शकता.

 

ही आहे स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

– UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in वर जा.

– वेबसाइटवर ‘आधार डाऊनलोड करा’ ऑपशनवर क्लिक करा.

– आता आधार/व्हीआयडी/नामांकन आयडीचे ऑपशन निवडा.

– Masked आधारच्या ऑपशनवर टिक करा.

– येथे काही महत्वाची माहिती नोंदवावी लागेल.

– माहिती नोंदवल्यानंतर Request OTP वर क्लिक करा.

– रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

– हा ओटीपी नोंदवा.

– येथे काही आणखी माहिती नोंदवावी लागेल.

– ही माहिती नोंदवल्यानंतर ‘आधार डाऊनलोड करा’ वर क्लिक करा.

– Masked आधार डाऊनलोड करू शकता.

 

#AadhaarTutorials
Download your Aadhaar from https://t.co/C190bVXBCk anytime anywhere.
You can choose to download ‘Regular Aadhaar’ that displays the complete Aadhaar number or ‘Masked Aadhaar’ which shows only the last four digits.
To learn more:https://t.co/xfmofQ9jSA

— Aadhaar (@UIDAI)

 

 

Web Title :- Aadhar Card | aadhaar latest news aadhaar card will be downloaded from one link know here complete process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा