Aadhar Card अपडेट करण्यातील सर्वात मोठा अडथळा झाला दूर, विना डॉक्युमेंट सुद्धा आता होऊ शकते ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड (Aadhar Card) हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. अनेक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. याशिवाय, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही कागदपत्रे आधारसोबत लिंक करणे देखील अनिवार्य आहे. आधारमधील माहिती अपडेट करता येऊ शकते. आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्यात लोकांना खूप अडचणी येत होत्या. याची दखल घेत आता युआयडीएआय (UIDAI) ने आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.

 

cnbctv18.com च्या रिपोर्टनुसार, आता एखाद्या आधार यूजर्सकडे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी कोणतेही दस्तऐवज नसले तरीही तो पत्ता अपडेट करू शकतो. कुटुंबप्रमुखाचा पत्ता आधार यूजर्स त्यांचा पत्ता म्हणून देऊ शकतात. UIDAI च्या नवीन प्रक्रियेनुसार कुटुंबप्रमुखाच्या मान्यतेनंतर आधारमधील पत्ता अपडेट केला जाऊ शकतो.

 

हा होईल फायदा
युआयडीएच्या या नवीन नियमामुळे मुले, पत्नीचा पत्ता आधारमध्ये अपडेट करणे सोपे झाले आहे. आता कुटुंब प्रमुखाच्या पत्त्यावर आधार अपडेट करणे शक्य होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३० दिवस लागतील. ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. आधार कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी अनेकांकडे कागदपत्रे नाहीत. आता ते त्यांच्या घराचा प्रमुख किंवा वडिलांच्या नावाने पत्ता अपडेट करू शकतात. हा नियम सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरू शकतो. या नव्या नियमामुळे मुले, पत्नी आणि पालकांना मोठा फायदा होणार आहे.

चेक करत रहा आधार हिस्ट्री
आधारच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्याने आधार कार्डबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका. अन्य कुणी व्यक्ती तुमचा चुकीचा फायदा घेणार नाही याची दक्षता घ्या. तुम्ही आधार हिस्ट्री ऑनलाइन तपासू शकता. ही आहे पद्धत…

 

सर्वप्रथम आधार कार्डची अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जा.

येथे My Aadhar पर्याय निवडा.

Aadhaar Services ऑपशनच्या खाली Aadhaar Authentication History लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.

आता एक नवीन विंडो उघडेल. तुमचा १२ अंकी आधार क्रमांक येथे टाका. सिक्युरिटी कोड प्रविष्ट करा आणि send OTP वर क्लिक करा.

आता तुम्ही आधार कार्ड हिस्ट्री डाउनलोड करू शकता. हिस्ट्री चांगल्या प्रकारे तपासा.
एखादी चुकीची माहिती दिसल्यास, आधार केंद्रावर जाऊन ती दुरुस्त करा.

 

Web Title :- Aadhar Card | aadhar card address change online know required documents and process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप