‘रेंट अ‍ॅग्रीमेंट’व्दारे ‘आधारकार्ड’वर पत्ता ‘अपडेट’ होत नाही मग ‘नो-टेन्शन’, ‘या’ स्टेप्स फॉलो केल्यानं ‘तात्काळ’ होईल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhar Card हे आता सर्वांसाठीच महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. हे आयडी प्रुफ पासून अ‍ॅड्रेस प्रुफपर्यंत काम करते. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची माहिती आधारमध्ये अपडेट होणे आवश्यक आहे. जर तुम्ही रेंटने (भाडे कराराने) राहत असाल तर तुम्हाला अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावे लागते. त्यामुळे तुम्ही रेंट अ‍ॅग्रीमेंटच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट करु शकतात. हे तुम्ही ऑनलाइन, ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करु शकतात. फक्त एक अट आहे, की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या रेंट अ‍ॅग्रीमेंटच्या माध्यमातून आधार अ‍ॅड्रेस अपडेट करता येणे शक्य नाही.

असा अपडेट करा आधारवरील रहिवासी पत्ता
UIDAI ची वेबसाइटवर जाऊन तुम्ही आधार सेल्फ सर्विस अपडेटच्या माध्यमातून सहज अ‍ॅड्रेस अपडेट करु शकतात, यासाठी तुम्ही UIDAI द्वारे मान्य करण्यात आलेले एक कागदपत्र द्यावे लागेल. यात एक अ‍ॅड्रेस प्रुफ रेंट अ‍ॅग्रीमेंट देखील असेल. अनेकांची तक्रार असते की भाडे कराराद्वारे ते अ‍ॅड्रेस अपडेट करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते रिजेक्ट होते.

तुम्ही रेंट अ‍ॅग्रिमेंट ज्या माध्यमातून ऑनलाइन किंवा ऑफलाइन तुमच्या आधारचा पत्ता अपडेट करु शकतात. सर्वात आधी तुमचे रेंट अ‍ॅग्रिमेट रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. जर तुमचे रेंट अ‍ॅग्रीमेट रजिस्टर्ड नसेल तर ते रिजेक्ट होईल. हे सुनिश्चित करा की रेंट अ‍ॅग्रीमेंट तुमच्याच नावे हवे. जर ते तुमच्या पतीच्या, मुलाच्या, पत्नीच्या नावे असेल तर तुमचा आधार अ‍ॅड्रेस अडपेट होणार नाही.

जर तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवरुन आधार कार्ड वरील पत्ता रेंट अ‍ॅग्रीमेंटच्या आधारे अपडेट करु इच्छित असाल तर हे लक्षात ठेवा की रेंट अ‍ॅग्रीमेंटच्या प्रत्येक पानाला स्कॅन करावे लागेल. परंतू ती सिंगल पीडीेएफ फाइलमध्ये अपलोड करा. जर तुम्ही जेपीईजी फोटो किंवा पीडीएफ अपलोड कराल तर UIDAI त्याला रिजेक्ट करेल.

जर तुम्ही आधार सेवा केंद्रात किंवा एनरोलमेंट सेंटर मध्ये जाऊन रेंट अग्रीमेंटच्या माध्यमातून आधार कार्डवरील पत्ता अपडेट करु इच्छित असाल तर रेंट अ‍ॅग्रिमेंटची सत्य प्रत घेऊन जा. तेथील अधिकारी तुमच्या कागदपत्राची झेरॉक्स घेतील आणि सत्य कागदपत्र तुम्हाला परत करण्यात येतील.

Visit  :Policenama.com