Budget 2020 : ‘आधार’कार्ड असेल तर ‘तात्काळ’ मिळणार PAN कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही आधार कार्ड काढले असेल तर तुम्हाला त्या आधारे पॅन कार्ड मिळू शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये ही घोषणा केली आहे. 11 नोहेंबरपर्यंत 29 कोटी 30 लाख 74 हजार 520 पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. यातच आता या नव्या योजनेमुळे पॅन कार्ड मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

याचा उद्देश काय आहे ?
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा उद्देश म्हणजे जे बनावट पॅन कार्ड काढतात त्याला आळा घालण्यासाठी आहे. यामुळे ‘मल्टीपल पॅन कार्ड’ बनवणे बंद होईल. जर तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न्स भरायचे असेल तर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे. मागच्या वर्षी आयटीआर फाइल करताना तुम्ही ही कार्ड लिंक केली असतील. याबद्दलची माहिती जर आयकर विभागाकडे असेल तर ती आपोआप अपडेट होईल.

हे जर काम करायचे असेल तर तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या ई फायलिंग वेबसाइटवर जाऊन हे चेक करु शकता. यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर ही माहिती मिळू शकेल. इथे तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करु शकता.