आता ‘आधारकार्ड’मधील चुका घरबसल्या दुरुस्त करता येणार ; ‘या’ आहेत सोप्या ‘ट्रिक्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारकार्ड न्यायालयाने सक्तीचे केले नसले तरी ते महत्वाच्या ओळखपत्रांविषयी एक आहे. सध्या कोणत्याही शासकीय कार्यालयात आधार कार्डचा वापर सक्तीचा झाला आहे. पण अनेकवेळा आधारकार्डातील लहान-लहान चुकांमुळे अतिशय महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील चुका दुरुस्त कशा करता येतील ? याची माहिती देणार आहोत. आधार कार्डवरच्या चुका आता तुम्ही घरबसल्या दुरुस्त करू शकता.

असे करा घरच्या घरी असे करा आधारकार्ड दुरुस्त
आधारच्या वेबसाईटवर जाऊन नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईलनंबर आणि ई-मेल ॲड्रेस अपडेट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जावं लागेल. या पोर्टलवर गेल्यावर तिकडे तुमचा आधार क्रमांक लिहा.

आधार क्रमांक लिहील्यानंतर तुमच्या रजीस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी पोर्टलवर टाकल्यावर तुम्हाला लॉग इन करता येईल. लॉग ईन केल्यावर अपडेट पोर्टलवर जाऊन डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. त्यानंतर आधार अपडेट फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये चुकीची माहिती बदलून सबमिट बटण दाबल्यावर तुमचं आधार कार्ड अपडेट होईल.

आधार कार्डवरची माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्यासाठीची कागदपत्रही द्यावी लागणार आहेत. पण ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि लिंग याबद्दलची माहिती बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही. तर नाव, जन्म तारीख आणि पत्ता यांची माहिती बदलण्यासाठी कागदपत्र देणं बंधनकारक असणार आहे. यासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशन किंवा पीडीएस फोटो कार्ड, व्होटर आयडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्र चालणार आहेत.