Aadhar Card-PAN Card Linking | ‘या’ तारखेपर्यंत पॅन कार्ड करा आधारशी लिंक; अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhar Card-PAN Card Linking | भारतीय नागरीकांसाठी आधार कार्ड (Aadhar Card ) आणि पॅन कार्ड (PAN card) हे दोन दस्तऐवज महत्वाचे आहेत. कोणत्याही खासगी अथवा सरकारी कामात या दोन कागदपत्रांची आवश्यकता असते. तसेच, प्राप्तिकर विवरणपत्र (Income tax return) भरण्यापासून ते मोठ्या बँकिंग व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणे गरजेचे असते. त्याचबरोबर इतर अनेक आर्थिक कामांसाठी (Financial Transactions) पॅन कार्ड असणं (Aadhar Card-PAN Card Linking) बंधनकारक असतं. तर, आधार कार्डचा वापर ओळख दर्शविण्यासाठी केला जातो. प्रत्येक नागरिकाकडे ही दोन कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

 

सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासह अनेक सरकारी कामांमध्ये या कागपत्रांची आवश्यकता असते. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड (Pan Card and Aadhar Card Linking) आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. आणि 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न (Aadhar Card-PAN Card Linking) करणाऱ्या नागरिकांचं पॅन कार्ड 1 एप्रिल 2022 पासून निष्क्रिय होणार आहे. म्हणून आधी हे काम करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. याची नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या.

 

Aadhar Card शी पॅन कार्ड लिंक करणे –

– सर्वप्रथम प्राप्तिकर कर विभाग अर्थात इन्कम टॅक्स विभागाच्या (Income Tax Department) वेबसाइटवर जा.

– आधार कार्डमध्ये दिल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

– Aadhar Card मध्ये फक्त जन्माचं वर्ष दिलं असल्यास चौकोनावर टिक करा.

– आता कॅप्चा कोड टाका.

– आता ‘लिंक आधार’ या बटणावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचं पॅन कार्ड (PAN card) आधारशी लिंक केलं जाईल.

 

एसएमएसद्वारे कसे कराल?

– तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल.

– यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका.

– त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक टाका.

– आता हा संदेश 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा.

 

दरम्यान, पॅन कार्ड काही कारणाने निष्क्रिय (Deactivate) झालं असेल तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला एक SMS पाठवावा लागणार आहे. तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून मेसेज पाठवण्यासाठी मेसेजमध्ये आधी 12 अंकी पॅन क्रमांक टाका. त्यानंतर स्पेस देऊन 10 अंकी आधार क्रमांक टाका. हा SMS 567678 किंवा 56161या क्रमांकावर पाठवा. तुमचं पॅन कार्ड पुन्हा कार्यरत (Activate) होणार आहे.

 

Web Title :- Aadhar Card-PAN Card Linking | please do pan card and aadhar card link quick check linking process in details and know last date of linking aadhaar pan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा