‘आधार’कार्ड तुमच्या नागरिकतेचा ‘पुरावा’ आहे की नाही ? UIDAI नं दिलं मोठं स्पष्टीकरण, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोण नागरिक आहे ? कोण नागरिक नाही ? या चर्चेच्या पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने हे स्पष्ट केले की, आधार कार्ड नागरिकत्वतेचा पुरावा नाही. हे देखील स्पष्ट केले आहे की, यूआयडीएआयच्या कार्यालयातून घुसखोर किंवा बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणार्‍या कोणालाही त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नोटिसा पाठविल्या जात नाहीत, मात्र काही राज्य जसे कि हैदराबादमध्ये चुकीच्या पद्धतीने चुकीच्या कागदपत्रांद्वारे आधार कार्ड बनविल्याची बाब उघडकीस आली, याची माहिती पोलिसांनी हैदराबाद विभागीय कार्यालयात पाठविली होती.

अहवालात पोलिसांनी म्हटले की, अशी 127 प्रकरणे आहेत, जी प्राथमिक माहितीनुसार भारतात बेकायदेशीरपणे दाखल झाली होती आणि त्यांचा आधार असल्याचे आढळले होते. कायद्यानुसार अशा प्रकारच्या आधार कार्डे जी चुकीच्या पद्धतीने घेतली गेली आहेत, ती रद्द केली जातात. या कायद्यात असेही म्हटले आहे की, आधार हे भारताचे नागरिक होण्यासाठी ओळखपत्र नाही, तर असे म्हटले आहे की, अशी व्यक्ती आधार मिळवण्यापूर्वी 182 दिवस भारतात राहते.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये बेकायदेशीरपणे भारतात आलेल्यांना आधार न देण्याचे निर्देश दिले होते. ज्यांनी आधार बेकायदेशीरपणे घेतला होता त्यांना प्रादेशिक कार्यालयात बोलविण्यात आले आहे, जेणेकरून ते त्यांचा आधार दावा रद्द करण्यापूर्वी सादर करू शकतील. यासाठी, त्या 127 लोकांना 20 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती कि, प्रादेशिक कार्यालयात जात त्यांची बायोमेट्रिक आणि इतर माहिती योग्यरित्या सांगावी.