‘सोपं’ झालं ‘Aadhaar’ कार्डवरील ‘पत्ता’ बदलणं, ‘या’ 4 स्टेप्स आणि आधार ‘अपडेट’ (व्हिडिओ)
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेत खाते सुरु करणे असो वा कर भरणे, सर्व कामांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्वाचे झाले आहे. हेच लक्षात घेऊन UIDAI ने आधारकार्डधारकांसाठी एक नवी सेवा सुरु केली आहे. नुकतेच UIDAI ने आपल्या घराचा पत्ता बदण्यासंबंधित सेवा सुरु केली आहे. तुम्ही आता घर बसल्या काही सेकंदात तुमचा आधार कार्ड वरील घराचा पत्ता बदलू शकतात.
काही मिनिटात बदला आधारवरील घराचा पत्ता –
UIDAI ने या संबंधित एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये आधार कार्डवरील घराचा पत्ता बदलण्यासंबंधित माहिती दिली आहे. UIDAI ने ट्विट करत सांगितले की https://uidai.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन ‘Online Address Update’ वर क्लिक करावे. योग्य पत्ता आणि कागदपत्र स्कॅन फाइल अपलोड कराव्यात. न लांबलचक रांगेचं टेंशन ना कोणतेही शुल्क.
असा बदला आधार कार्डवरील पत्ता –
स्टेप 1 – सर्वात आधी https://uidai.gov.in/ या UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन My Adhaar या टॅबवर जावे. ड्रॉपडाऊनच्या दुसऱ्या टॅबमध्ये Udate Your Aadhaar मध्ये जाऊन ड्रॉपडाऊनमध्ये तिसरा पर्याय Update your address online वर क्लिक करावे.
स्टेप 2 – यावर क्लिक केल्यानंतर नवे पेज ओपन होईल. जिथे खाली Proceed to Update Address वर क्लिक करा. त्यानंतर नवे पेज ओपन होईल.
स्टेप 3 – या पेजवर सर्वात आधी तुमचा आधार नंबर त्यानंतर कॅच्पा वेरिफिकेशन टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. तो ओटीपी एंटर करा आणि Login वर क्लिक करा.
स्टेप 4 – या पेजवर आता Update Address via Address Proof, Update Address via Secred Code असे पर्याय येतील.अॅड्रेस प्रुफचा पर्याय निवडल्यावर तुमचे नवे अड्रेस (घराचा पत्ता) डिलेट्स भरावे लागतील. तसेच योग्य दस्तावेज अपलोड करावे लागेल.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –