Aadhar- Pan Link | पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Aadhar- Pan Link | लोकांसाठी आधार आणि पॅन कार्ड संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे एकमेकांशी लिंक (Aadhar- Pan Link) केले नसेल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंक न केल्यास 31 मार्चनंतर ते पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. प्राप्तिकर विभागाने पॅनधारकांना मार्च 2023 अखेरपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे.

त्यामुळे ज्यांनी कुणी अद्याप पॅन आधारशी लिंक केलेले नाही, त्यांनी फार काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही ऑनलाईन, एसएमएसद्वारे घरबसल्या पॅन आधारशी लिंक (Aadhar- Pan Link) करू शकता. सवलतीच्या श्रेणीत न मोडणार्‍या सर्व पॅनधारकांसाठी आधार लिंक करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन आधार पॅन लिंक करू शकता.

 

एसएमएसच्या माध्यमातून लिंक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

1 : टेक्स्ट मेसेज अ‍ॅपवर जा
2: फॉर्मेटमध्ये मेसेज टाईप करा
3 : मेसेजमध्ये तुम्हाला फक्त UIDPAN (स्पेस) 12 डिजिट आधार नंबर(स्पेस) आणि 10 डिजिट पॅन नंबर टाकायचा आहे.
4 : आपल्या रजिस्टर्ड नंबरवरून 567678 या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा आहे.
5 : मेसेज सेंड होताच तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झाल्याचे कन्फर्मेशन प्राप्त होईल.

 

पॅन कार्ड निष्क्रिय असल्याने ही अडचण येऊ शकते

5 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करता येत नाही.
बँकांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त ठेवी ठेवता आणि काढता येणार नाहीत.
पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास कर विवरणपत्र भरले जाणार नाही.
कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात अडचणी येतील.
म्युच्युअल फंड किंवा आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही.
सरकारी योजनांचा लाभ घेतानाही अडचणी येतील.

 

10 हजार रुपयांपर्यंत दंड

पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास अशा लोकांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खाती उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय हे पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरल्यास मोठा दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 272B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

तुम्ही ई- फिलिंग वरूनदेखील आधार- पॅन लिंक करू शकता

प्रथम 1000 रुपये भरावे लागतील
सर्वप्रथम आयकर वेबसाइटवर जा.
येथे क्विक लिंकमधील आधार लिंकवर क्लिक करा.
पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
पेमेंटसाठी NSDL वेबसाइटला भेट देण्याची लिंक दिसेल.
CHALLAN NO./ITNS 280 मध्ये, Proceed वर क्लिक करा.
टॅक्स अ‍ॅप्लीकेबल (0021) Income Tax(Other than Companies) निवडा.
टाइप ऑफ पेमेंटमध्ये (500) Other Receipts ला निवडावे लागेल.
पेमेंट मोड, नेट बँकिंग आणि डेबिट कार्ड असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
तुमच्या सोयीनुसार तुम्ही दोनपैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
परमनंट अकाउंट नंबरमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर टाका.
मूल्यांकन वर्ष 2023-2024 निवडा.
पत्तामध्ये तुमचा कोणताही पत्ता टाका
आता कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा.
Proceed वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमची भरलेली माहिती स्क्रीनवर दिसेल.
माहिती तपासल्यानंतर I Agree वर खूण करा, Submit to Bank वर क्लिक करा.
तुम्ही प्रविष्ट केलेल्या तपशिलांमध्ये काही विसंगती असल्यास, संपादन वर क्लिक करा.
आता नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड पर्याय निवडून Others मध्ये 1000 रुपये भरा.
व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ मिळेल. हे डाउनलोड तुमच्याकडे ठेवा.
हे पेमेंट अपडेट होण्यासाठी 4-5 दिवस लागतील.

पेमेंट भरल्यानंतरची प्रक्रिया

4-5 दिवसांनंतर तुम्हाला आधारच्या आधारे प्राप्तिकर वेबसाइटवरील लिंकवर पुन्हा क्लिक करावे लागेल.
पॅन नंबर आणि आधार क्रमांक टाका आणि व्हॅलिडेट वर क्लिक करा.
तुमचे पेमेंट अपडेट केले गेले असेल तर स्क्रीनवर continue चा पर्याय दिसेल.
Continue वर क्लिक करा आणि आधार कार्डानुसार नाव आणि मोबाईल नंबर टाका.
I Agree वर टिक करून पुढे जा. आता तुम्हाला एक OTP मिळेल.
OTP टाका आणि validate वर क्लिक करा. आता एक पॉप अप विंडो उघडेल.
तुमची आधार पॅन लिंकिंगची विनंती प्रमाणीकरणासाठी UIDAI कडे पाठवण्यात आली आहे, असे पॉप अपमध्ये लिहिले जाईल.
सत्यापनानंतर, तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल. त्यानंतर तुम्ही आयकर वेबसाइटवर त्याची स्थिती तपासू शकता.

 

Web Title :- Aadhar-Pan Link | If PAN-Aadhaar is not linked, PAN card will become inactive after March 31; Know the linking process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parbhani Crime News | वहिनी जीव देईल, असा फोन येताच परभणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन्…

Nagpur ACB Trap | अदखलपात्र गुन्हा निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी, महिला स्वच्छतागृहासमोर लाच घेताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात