Aaditya Singh Rajput | राहत्या घरात प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Singh Rajput | सिनेसृष्टीतील प्रसिद्ध मॉडेलचा मृत्यदेह अचानक राहत्या घरात आढळल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri) येथील राहत्या घराच्या बाथरुममध्ये प्रसिद्ध अभिनेता (Actor), मॉडेल (Model) व कास्टिंग दिग्दर्शक (Casting Director) आदित्य सिंह राजपूतचे (Aaditya Singh Rajput) सोमवारी (२२ मे) दुपारी संशयास्पद निधन झाले आहे. त्याच्या मृत्यू मागील ठोस कारण अद्याप कळालेले नाही.
Actor Aditya Singh Rajput found dead at his apartment in Andheri area. Body sent for post-mortem. Investigation underway: Mumbai Police
(Pic: Aditya's Instagram) pic.twitter.com/1ZHbKB9ilp
— ANI (@ANI) May 22, 2023
या संशयास्पद मृत्यूचे (Death) कारण आता जरी कळाले नसले तरी ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
अंधेरीमध्ये एका इमारतीत ११व्या मजल्यावर आदित्यचे घर होते. याच घरामध्ये त्याच्या काही मित्रांना घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळला.
बिल्डिंगमधील मित्रांनी वॉचमॅनच्या सहाय्याने त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्याचा मृतदेह शवविच्छेनसाठी (Postmortem) पाठविण्यात आला आहे.
त्यानंतर आदित्यच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. आदित्यच्या आकस्मित निधनाने सर्वांना धक्काच बसला आहे.
Web Title : Aaditya Singh Rajput | Suspicious death of famous model and actor in residence
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा