Aaditya Thackeray | दावोस दौऱ्याच्या खर्चावरुन आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, म्हणाले-‘4 दिवसांसाठी 40 कोटी, शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला?’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवेसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन (CM Davos Visit) पुन्हा एकदा टीका केली आहे. फक्त सही करुन आल्यावर कामं होत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ज्या कंपन्यांसोबत MOU करुन आले त्या कंपन्या कुठल्या असा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोला असं थेट आव्हान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिले आहे.

 

दावोस दौऱ्याच्या खर्चावरुन बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, चार दिवसांच्या या दावोस दौऱ्यात साधारणत: 35 ते 40 कोटी रुपये अंदाजित खर्च झाला. म्हणजे दिवसाला साडेसात ते दहा कोटी रुपये खर्च झाला, असा दावा त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा हस्यास्पद असल्याचे देखील ठाकरेंनी म्हटले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

दौऱ्याचा तपशील येणं आवश्यक
दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक (Investment) झाली असा दावा सरकारने केला आहे. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा (Government of Maharashtra) जो अधिकृत कार्य़क्रम होता, हा कार्यक्रम चार दिवसांचा असेल असं वाटलं होतं. कारण 16 ते 20 जानेवारी असा कार्यक्रम ठरवला होता. या कार्यक्रमासाठी आम्हाला कळालेला अंदाजित खर्च 35 ते 40 कोटीच्या घरात आहे. चार दिवसांसाठी 40 कोटी खर्च केले. यामध्ये आणखी नवीन खर्च वाढू शकतो, तिकडे मित्रपरिवार गेला होता? त्याठिकाणी कोणत्या गाड्या वापरल्या? याचा तपशील पुढे येणं आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला
त्यांनी प्रत्येक दिवसाला दहा कोटी रुपये खर्च केला. त्यांनी मोठं पव्हेलियन घेतलं असेल. पण सरकारमध्ये खर्च कसा दाखवायचा हे त्यांना चांगलं माहित आहे. अजून एक महत्त्वाचे म्हणजे, दावोसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा (Chartered Plane) वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला. हा खर्च राज्यावर आला असेल. माझा चार्टर्ड विमानाला विरोध नाही. मात्र तुम्ही कमर्शिअल विमानाऐवजी चार्टर्ड विमानाचा वापर लवकर पोहोचण्यासाठी करता. पण एकनाथ शिंदे उशिरा पोहचले, असा दावा त्यांनी केला आहे.

 

मुख्यमंत्री उशिरा पोहोचले
16 जानेवारीला दावोस दौऱ्याचा पहिला दिवस होता. यादिवशी अनेक बैठका आणि उद्योजकांच्या भेटीगाठी होणार होत्या. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकाळी लवकर पोहोचणं अपेक्षित होते. मात्र ते सायंकाळी साडेचार-पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचले. मागील वर्षी 22 मे 2022 ला आम्ही सकाळी साडेआठ वाजता आमच्या पव्हेलियनचं उद्धाटन केलं. मात्र एकनाथ शिंदेंनी सायंकाळी साडेसहा-सात वाजता उद्घाटन केलं. त्यामुळे आधीच्या नियोजित बैठका रद्द झाल्या. त्यांच्या बैठकांचे फोटो किंवा इतर पुरावे आम्हाला कुठेच दिसले नाहीत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण होतं? मित्रपरिवार सोबत गेला होता का? ते कुठे राहिले? त्यांचा खर्च कोणी केला? हे सर्व लोकांना समजले पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Aaditya Thackeray | aaditya thackeray on cm eknath shinde davos visit and total cost

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | एकाच कुटुंबातील 7 जणांच्या आत्महत्येचे गुढ उकलले, मुलाने मुलीला पळवून नेलं अन्…, पुणे जिल्ह्यात खळबळ

Jayant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘लोक फार हुशार आहेत, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना…’

Devendra Fadnavis | या दिवशी होणार राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तारिख