Aaditya Thackeray | गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी दहिहंडी, गणपती मंडळे आणि फोडाफोडीशिवाय काय केले? – आदित्य ठाकरे

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन – टाटा एअरबसचा (Tata Airbus) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे विरोधक संतापले आहेत. आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्र्यांचा दिनक्रम आणि कार्यक्रम काढत त्यांच्यावर टीका केली आहे. गेल्या तीन महिन्यात मुख्यमंत्र्यांनी काय केले, असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विचारले.

इतर राज्यांमधील मुख्यंमंत्री त्यांच्या राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी फिरत असतात. मात्र, आमचे मुख्यमंत्री मंडळे, दहिहंडी, राजकीय फोडाफोडी, राजकीय भेटी सोडून कुठेही फिरत नाहीत. शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) असतील किंवा नवीन पटनायक (Naveen Patnaik) असतील हे मुख्यमंत्री जसे दुसऱ्या राज्यात जातात. ते तेथे जाऊन प्रभावीपणे उद्योजकांना आणि उद्योगांना भेटी देतात. तसे आपले मुख्यमंत्री तीन महिन्यात एकतरी राज्यात गेले आहेत का? त्यामुळे वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्पानंतर राज्यातील चौथा मोठा प्रकल्प राज्यातून निघून गेला आहे.

22 हजार कोटी एवढी मोठी किंमत असलेला हा प्रकल्प नागपूर या ठिकाणी होणार होता. पण ऐनवेळी हा प्रकल्प गुजराच्या बडोद्याला नेण्यात आला आहे. यावरुन राज्यात सध्या मोठे घमासान सुरु आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेला हा चौथा प्रकल्प आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) क्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. खोके सरकारवर कुठल्याही उद्योजकाचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आपल्या राज्यात येणारी गुंतवणूक आणि प्रकल्प दुसरीकडे चालले आहेत, असे ठाकरे म्हणाले.

राज्यात जून महिन्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडून
शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) आले.
त्यानंतर राज्यातून एका मागोमाग एक असे तीन प्रकल्प गुजरातला गेले.
हे तीन प्रकल्प एकाच राज्यात गेले हा योगायोग नाही.
त्यामुळे हे नवीन सरकार महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठीच तयार करण्यात आले आहे, अशी शंका येते.
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधी तीन आणि आता चौथा प्रकल्प गुजरातला गेला आहे,
असे माजी उद्योग मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले आहेत.

Web Title :- Aaditya Thackeray | aaditya thackeray slams cm eknath shinde over tata airbus project

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांच्या ‘त्या’ वाक्याची उडवली खिल्ली

Uric Acid | वाढली असेल सांधेदुखी तर ‘या’ 5 पद्धतीने मिळवू शकता आराम, जाणून घ्या

Tata Airbus Project | राज्यातील उद्योग गुजरातला पळवण्यासाठीच मिंदे सरकार आले; सुभाष देसाईंची जोरदार टीका