Aaditya Thackeray | ‘खोके सरकार बनवताना तुम्हाला गाजर मिळालं. महाराष्ट्राला गाजर नको रोजगार पाहिजे’, आदित्य ठाकरेंचा तळेगामध्ये आक्रोश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात (Talegaon) जन आक्रोश मोर्चा (Jan Akrosh Morcha) काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी (Vedanta Foxconn Company) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला (State Government) खोके सरकार म्हणून पुन्हा हिणवलं. मुख्यमंत्र्यांनी एक दीड महिन्याआधी विचारलं असतं तर सांगितलं असतं की साहेब त्यांच्याकडेही 50 खोक्के पोहोचवा आणि एकदम ओक्के करा, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पुढे म्हणाले, गुजरातबद्दल मी काही चुकीचं बोलणार नाही. कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. तिकडचे जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी बघितलं की इथे सरकार बदललं आहे. इथे घटनाबाह्य सरकार बनलं आहे. हे सरकार जे कोसळणार आहे. तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. हे खोके सरकार बनल्यानंतर त्यांनी मौके पर चौका मारला आणि महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. त्यांचा महाराष्ट्रावरच डोळा होता. महाराष्ट्रात सरकार बदलतं कधी आणि चांगला प्रकल्प इतर राज्यात घेऊन जातो कधी यासाठी ते प्रयत्नशील होते.

 

मी गुजरात आणि केंद्राला दोष देणार नाही. मी दोष देणार तर फक्त नकर्ते सरकारला दोष देणार. कारण त्यांच्याच नाकर्तेपणामुळे हा प्रोजेक्ट इथून तिथे गेला. ज्या प्रकल्पाला आपण दहा हजार कोटींची सबसिडी जास्त देतोय, ज्या प्रकल्पाला आपण वीज, पाणी देतोय, सगळ्या सवलती देतोय, या तळेगावमध्ये काही कमी आहे का? तरुण-तरुणी आहेत, रस्ते आहेत, कॉलेज आहे, ऑटोमोबाईलचा हब (Automobile Hub) आहे. इथून पुणे आणि मुंबईला कनेक्टिवीटी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वेदांता फॉक्सकॉन कधी आला,
कसा आला आणि गेला हे समजलं नाही, असा टोला लगावला. रोजगाराचा (Employment) प्रश्न शिवसेनेने मांडला.
वेदांचा प्रश्न प्रथम शिवसेनेनं मांडला, पुढे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) देखील उभी राहिली.
महाराष्ट्रातील जनता देखील वेदांताच्या मुद्यावर उभी राहिली. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खपसला याचं दु:ख आहे.
महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खोके सरकारनं खुपसला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
दिल्लीत स्वत:साठी 8 ते 9 वेळा गेलात.
पण महाराष्ट्राला काय आण कधी मिळणार हे विचारण्यासाठी दिल्लीला कधी जाणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

 

खोके सरकार बनवताना तुम्हाला गाजर मिळालं होतं. महाराष्ट्राला गाजर नको रोजगार पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आमच्या पाठीवर 40 वार करुन गेलात पण महाराष्ट्राच्या तरुणांच्या पाठीवर का वार करता, असा सवाल ठाकरे यांनी केला.
वेदांतानंतर बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park) महाराष्ट्रातून निघून गेला आहे.
महाराष्ट्रातील तरुण नोकऱ्यांची रोजगाराची वाट पाहतेय. मात्र बल्क ड्रग पार्क महाराष्ट्रात आला नाही,
याचं देखील दु:ख वाटतं, असंही ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Aaditya Thackeray | aaditya thackeray slams eknath shinde at talegaon jan akrosh morcha over vedanta foxon company project pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breast Pain Before Period | मासिक पाळीपूर्वी स्तन दुखण्याचा त्रास होत असेल तर असू शकते ‘हे’ कारण, जाणून घ्या उपचार

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई