मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park), मेडिकल डिव्हाईस (Medical Devices) आणि आता टाटा एअरबस (Tata Airbus) हा 22000 कोटी किंमतीचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना धारेवर धरले आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका केली आहे. निवडणुकांना जे सामोरे जायला घाबरतात, ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील, असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले आहेत.
यावेळी आदित्य ठाकरे पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ठाकरे म्हणाले, राजकारण संपवून शाश्वत विकासावर काम करण्याची गरज आहे. कोणत्याही सरकारने जनतेच्या हिताचाच विचार करायला हवा. खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातून पळ काढत आहेत. निवडणुकांना जे सामोरे जायला घाबरतात, ते काय गुंतवणूक महाराष्ट्रात आणतील. आपले मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात जाऊन गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते फक्त दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्री मंडळांना भेटी देतात. फोडाफोडी करण्यासाठी ते फिरत असतात.
तसेच महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) असताना, अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आले होते. मविआने 80 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा करार केला होता. तेव्हा केंद्रात त्यांचेच सरकार होते. पण आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का जात आहेत, महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमी अपयश का येत आहे. राज्याचा कृषीमंत्री कोण हे अजून शेतकऱ्यांना माहीत नाही. त्यांनी अजून कोणाच्या बांधावर दौरा केला नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण ते माहीत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे, ते कळायला मार्ग नाही. महाराष्ट्रातील चार प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे युवकांचे नुकसान झाले. उदय सामंतानी (Udaya Samant) एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे सांगितले होते.
पण त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांशी गद्दारी का केली? ते खोटे बोलत आहेत.
एखादा करार जर कोणत्या राज्यासोबत झाला, तर तो प्रकल्प दुसऱ्या कोणत्याही राज्यात जाऊ शकत नाही,
मग ते कशाच्या जोरावर आश्वासने देत होते, असे ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले.
Web Title :- Aaditya Thackeray | aaditya thackeray talk about eknath shinde airbus project and pune issues
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर