Aaditya Thackeray | उदय सामंतांच्या ‘त्या’ आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार; म्हणाले “दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray | राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या (I.N.D.I.A.) बैठकीवरुन जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. इंडिया आगाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये (Grand Hyatt Hotel Mumbai) आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील अनेक विरोधी पक्षातील नेते मुंबईमध्ये आले असून या दोन दिवसीय बैठकीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधत सामंतांनी इंडिया आघाडीच्या या बैठकीचा संपूर्ण खर्च मांडला. त्यांच्या या वक्तव्यावर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. तुमचा गुवाहटीचा खर्च, प्रोव्हेट प्लेनचा खर्च कोणी केला हे आधी सांगा मग आमचा हिशोब सांगा असे आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत (Uday Samant VS Aaditya Thackeray) यांना सुनावले आहे.

मुंबईमध्ये पार पडत असलेल्या इंडिया आघाडी बैठकीवरुन उदय सामंत यांनी राष्ट्रवादी (NCP) व शिवसेना ठाकरे गटावर (Shivsena Thackeray Group) टीकेची झोड उडवली. यावर प्रतिउत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, “गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला? तेव्हा चार्टड प्लेनचा खर्च कोणी केला? तसेच 50 खोके कोणी दिले? आधी स्वत:च्या कार्यक्रमाच्या खर्चावर बोला.” असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील आरोप केला आहे. दसरा मेळाव्याच्या वेळेस शिंदेंनी एसटीसाठी 10 कोटी रुपये दिले असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील प्रमुख नेते ठरत आहेत. इंडिया आघाडीचा उद्देश व हेतू स्पष्ट करत आम्ही देशप्रेमी पक्ष एकत्र आलो आहोत असे आदित्य यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, “आम्ही देशाचा आवाज पुढे घेऊन जात आहोत. देशाचे संविधान पुढे नेत आहोत. आम्ही लोकशाहीसाठी लढत आहोत. आम्ही देशाचा आवाज संसदेत पोहोचवणार आहोत. त्यामुळे कोण काय बोलतंय याचा काही फरक पडत नाही. आम्ही सगळे देशप्रेमी पक्ष एकत्र आलो आहोत. आमची पहिली बैठक पाटणा (Patna) येथे झाली होती. दुसरी बंगळुरुमध्ये (Bengaluru) झाली. अनेक पक्ष व लोक आमच्याशी जोडले जात आहेत. आमची लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. लोक आता एकत्र येतायत त्यामुळे यापुढे बदल नक्की होईल.” असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

उदय सामंत हे म्हणाले होते की “इंडिया आघाडीमधील बहुतांशी नेत्यांनी बाळासाहेबांवर टीका केली होती.
कलम 370 (Article 370), राम मंदिर (Ram Mandir), कारसेवा अशा बाळासाहेबांच्या मागणीवर या इंडिया आघाडीमधील
नेत्यांनी सडकून टीका केली होती.” यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की राम मंदिराचे श्रेय भाजपाचे नाही.
ते म्हणाले की, “आम्ही स्वत: राम मंदिराच्या ठिकाणी गेलो होतो.
राम मंदिराचा विषय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी समोर आणला होता.
आधी मंदिर आणि नंतर सरकार हे आम्ही सांगितलं होतं. राम मंदिर उभारण्यासाठी भाजपचं श्रेय शून्य आहे.
जो निकाल आला तो सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचं काही काम नाही,” अशा शब्दामध्ये
आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रतिउत्तर दिले आहे.
सामंत यांनी आघाडीच्या बैठकीचा लेखाजोखा मांडल्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी गुवाहटीचा
हिशोब मागितला आहे. मुंबईतील आघाडीच्या बैठकीवरुन महाराष्ट्राचे राजकारण रंगताना दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना…’ विरोधकांच्या बैठकीवरुन भाजपचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Vijay Wadettiwar | शिंदे-फडणवीसांनी अजित पवारांची ‘पॉवर’ केली कमी; विजय वडेट्टीवारांचा टोला, ‘आता मुख्यमंत्र्यांना कळेल’