Aaditya Thackeray | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसंवाद यात्रेनिमित्त (Shivsamvad Yatra) शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी आयोजीत सभेदरम्यान बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मी वरळी (Worli Assembly Constituency) मधून माझ्यासमोर निवडणुक लढवून दाखवा असे आव्हान दिले, मात्र त्यांनी ते स्विकारले नाही. पण आता आपण दोघेही राजीनामा देऊ तुम्ही वरळी जिंकूण दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात येवून लढतो. असे थेट आव्हान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी नाशिक रोड येथील आनंदऋषी शाळेजवळील मैदानात आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘आज दोन गोष्टींचा आनंद आहे की, आज येथे महिला मोठ्या संख्येने उपस्थित असून कोणत्याही पक्षात महिलाशक्ती खूप मोठी असते. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, येथे मला अनेक तरूण चेहरे दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. तसेच निवडणुका झाल्यावर दिसेल की शिवसेना एकच आहे आणि ती माझ्यासमोर बसलेली आहे. खरं तर नाशिकच्या निवडणुकीत शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या चांगल्या लढल्या. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. तसेच महाविकास आघाडीसोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे. ‘ असा विश्वास देखील यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

तर पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्यासोबत गद्दारी झालेली आहे. आणि ती कोणालाच पटली नाही. मात्र, आम्ही कोणाच्याही पाठीत वार केला नाही. हे ४० गद्दार सांगू शकता का? सुरत, गुवाहटी, गोवा मार्गे आलेले सांगू शकतील का? ५० खोके एकमद ओके असे लोक त्यांना बोलतात. ही घोषणा सगळीकडे दिली जात आहे. विधानभवनात ते सुद्धा ओके म्हणतात. राज्यकर्त्यांनी स्वतःला विकून टाकले, का गेले, कोणासाठी गेले. असा सवाल देखील त्यांनी (Aaditya Thackeray) यावेळी उपस्थित केला.

तर, मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झाले, तेव्हा तुम्हाला आनंद नाही झाला. आज मी महाराष्ट्र फिरत आहे. जनतेला सांगतो आहे, मी आहे तिथेच आहे, तुमच्यासाठीच आहे. आपल्या सभेत लोक येतात आणि आम्ही शिवसेन सोबत आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्यांचे ते फॅन झाले आहे. जे आपले मतदार नव्हते ते देखील शिवसेनेसोबत आहेत. हे गल्लीच राजकारण आपल्याला पळवून लावायचं असल्याचे यावेळी ते म्हणाले.

आपले सरकार राज्यात नसले तरी जनता आपल्यासोबत आहे.
तर दुसरीकडे खोके वाटून रिकामे झाले तरी लोकं त्यांच्याकडे येत नाहीत.
त्यांची कॅसेट ऐकली का? आम्ही सहा महिन्यापूर्वी क्रिकेट खेळलो, दहीहंडीचा थर लावला, असे सांगताता.
४० आमदार पळविले १३ खासदार पळविले.
पण आता त्यांनी राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळीत उभे रहावे.
असे जाहीर आव्हान देखील यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणत्याही सभेत गेले तरी तीच कॅसेट ऐकविताता. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.
जनतेसाठी तुम्ही काय केले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Web Title :- Aaditya Thackeray | aditya thackeray open challenge to the chief minister meet warli or thane vidhansabha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं