मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Aaditya Thackeray | नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र या लोकार्पण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे आदित्य ठाकरे यांनी आरेतील सावरकर उद्यानात बोलताना मनातील खंत बोलून दाखवली. (Aaditya Thackeray)
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आम्हाला कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. आम्हाला आमंत्रण का दिलं नाही हे सरकारला तुम्हीच विचारा. महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं पण त्यांच्या नातवालाच बोलावलं नाही अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. तसेच आरेतील मेट्रो कारशेडला आमचा विरोध कायम असेल. मेट्रो आणि कारशेडला हा विरोध नाहीय, पण जंगलहानी करून होत असलेल्या कारशेडला हा विरोध असल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. (Aaditya Thackeray)
यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटासह राज्य सरकारवरदेखील जोरदार टीका केली. निर्भया निधीतून पथकासाठी राखीव जीप्स घेतल्या त्या आज गद्दा्रांसाठी वापरल्या जातायत असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर या गद्दार सरकारमधील एका मंत्र्यांने आक्षेपार्ह भाषा वापरली तरीदेखील अजून त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच आपलं सरकार येणार, पुन्हा वेगानं शाश्वत विकास करणार असा विश्वासदेखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Web Title :- Aaditya Thackeray | aditya thackeray says no invitation for samruddhi mahamarg inaugration at nagpur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update