Aaditya Thackeray | दीपक केसरकारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ते तर माझ्या आजोबांकडे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटले तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबुल केले होते, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला होता. यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

दीपक केसरकर यांनी केलेल्या दाव्याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारले असता ते म्हणाले, ते (दीपक केसरकर) सध्या आमच्याबद्दल बोलत आहेत, परंतु त्यांनी स्वत: आतापर्यंत अनेकदा त्यांचं वक्तव्य बदललं आहे. ते तर माझ्या आजोबांकडे रोज हिंदुत्व शिकायला यायचे. त्यांचं तुम्ही ऐकताय. ते आता सांगतील की त्यांच्याकडून सर्वजण ट्युशन घ्यायला यायचे. जाउ दे, काही लोक असे बोलत राहतात, त्यांना सवय आहे, सोडून द्या, असे प्रत्युत्तर दिले.

 

काय म्हणाले दीपक केसरकर?
काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षांनी उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडावी, आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवलेले नाही. त्यांनी स्वत:च आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे, असे केसरकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र
आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दीपक केसरकर म्हणाले, कोणाला खोके-खोके म्हणता,
खोक्यासोबत खेळायची आदित्य यांना लहानपणापासून सवय असेल, आम्हाला नाही. जनता आमच्या सोबत आहे,
म्हणून आम्ही आमदार आहोत, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे मुख्यमंत्री असताना कोकणाचा निधी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 25 कोटींपर्यंत घटवला.
त्यावेळी आदित्य ठाकरे कुचेष्टेने हसत होते. याचे व्हिडिओ आहेत.
त्यांना कोकणाबाबत किती अस्था आहे हे समोर आले पाहिजे, असेही दीपक केसरकर म्हणाले.

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | aditya thackeray slams deepak kesarkar says they learned hinduism from my grandfather

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Mahavitaran News | भरधाव वाहनाच्या धडकेने वीजखांब जमीनदोस्त; पर्यायी व्यवस्थेतून चाकणमधील वीजपुरवठा सुरु

Salman Khan | पुन्हा एकदा सलमान खानला ईमेल द्वारे जीवे मारण्याची धमकी; “अगली बार बडा झटका देंगे, ….”

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…