Aaditya Thackeray | धनुष्यबाण हा आपलाच राहणार ! ‘बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही’ – आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray | एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडानंतर आधी संयमी भूमिका घेतलेल्या शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्याकडे 40 आमदार असल्याचा दावा बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब असे नाव दिल्यानंतर शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना उघडपणे सुनावण्यास सुरूवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) , युवानेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) तसेच खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

आता सांताक्रूझमध्ये आयोजित मेळाव्यात युवानेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना थेट इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, धनुष्यबाण हा आपलाच राहणार. यासोबतच प्रत्येक आमदार जरी तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होईल.

 

आदित्य म्हणाले, उद्धवजींनी मोह सोडलाय, जिद्द आणि ताकद नाही. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे नाव लावतात. तुमची लायकी असती तर सुरतमध्ये पळाला असता का? बंड ठाण्यात बसून मुंबईत बसून केले असते. महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले. एकाने विचारले आदित्यजी कसे वाटत आहे, मी म्हटले, लोकांचे प्रेम दिसत आहे. पर्यावरण मंत्री म्हणून माझे हेच काम होते राज्यात कुठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे. (Aaditya Thackeray)

 

आदित्य पुढे म्हणाले, धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलेच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपामध्ये विलीन होणे. परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा, असे आव्हान आदित्य यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 20 मे रोजी उद्धव ठाकरे यांनी
एकनाथ शिंदेंना विचारले तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? पण जे झाले ते झालेच.
बंडखोरांना माफी नाही. महत्त्वाची खाती होती, पक्षात वजन होते इथे मानसन्मान मिळत होता.
ज्यांना जायचे आहे त्यांना दरवाजे खुले आहेत. काय होते तुम्ही आणि काय जोक झालाय तुमचा.
जिथे पूर आलाय लोकांना खायला अन्न नाही अशा ठिकाणी तुम्ही मजा मारताय.

 

आदित्य ठाकरे म्हणाले, संरक्षण काश्मिरी पंडितांना द्यायला हवे ते कुठे वापरले जात आहे पहा.
चार्टर्ड प्लेन, हॉटेलचा खर्च किती असेल, अपहरण केलेल्या आमदारांना कपडे देण्याचे बिल किती असेल.
जी 20 मध्ये जेव्हा आपल्या देशात लोक येणार तेव्हा त्यांना वाटेल येथे लोकशाही आहे की नाही, असा घणाघात आदित्य यांनी केला.

 

Web Title :- Aaditya Thackeray | aditya thackeray speech over eknath shinde revolt
and political situation in maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा